कर्नाटकातील रामेश्वरम कॅफेमधील स्फोटात 10 जण जखमी झाले आहेत. बेंगळुरूच्या (Bengaluru Blast) ब्रुकफिल्ड भागात असलेले रामेश्वरम कॅफे प्रसिद्ध आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य केले जात असल्याचे कॅफेच्या सहसंस्थापक दिव्या राघवेंद्र राव यांनी सांगितले. तसेच जखमींना आवश्यक ती मदत केली जात आहे. याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस स्फोटाचा अधिक तपास करत आहेत. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला. कॅफेमध्ये बॅग ठेवणाऱ्या आरोपीची सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट घडवण्यासाठी टायमरसह आयईडी उपकरणाचा वापर करण्यात आला होता.
या बॉम्बस्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एकदा स्फोटही झाला आहे. स्फोटानंतर लोक घटनास्थळावरून पळताना दिसत आहेत. स्फोटाबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हा स्फोट घडवण्यासाठी एका छोट्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा वापर करण्यात आला होता. हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. बाराच्या सुमारास एक तरुण कॅफेमध्ये आला. त्याने कॅफेमध्ये एक छोटी बॅग सोडली. तासाभरानंतर बॅगचा स्फोट झाला. 28 ते 30 वयोगटातील एका तरुणाने रवा इडली खाण्यासाठी काउंटरवरून टोकन घेतले. पण, त्याने इडली खाल्ली नाही. त्याने छोटी बॅग तिथेच सोडली. तासाभरानंतर स्फोट झाला. तपास यंत्रणा आरोपींचा शोध घेत असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. (Bengaluru Blast)
(हेही वाचा Bombay High Court च्या आदेशामुळे निवडणूक कामापासून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटका)
फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी
आतापर्यंतच्या पोलिस तपासात असे समोर आले आहे की, त्या बॅगशिवाय कॅफेच्या आवारात दुसरा कोणताही आयईडी सापडलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि बॉम्ब निकामी पथकानेही घटनास्थळी भेट दिली आहे.
Join Our WhatsApp Community