Mumbai Riots : ९३च्या मुंबई दंगलीतील आरोपीला ३१ वर्षांनी अटक

152

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या दंगलीतील (Mumbai Riots) फरार आरोपीला ३१ वर्षांनी शिवडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. सय्यद नादीर शहा अब्बास खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, गुन्हा घडला त्यावेळी सय्यद तरुण होता,  आता त्याचे वय ६५ वर्षे आहे.

जामिनावर बाहेर आल्यापासून होता फरार 

रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सय्यद याच्या विरुद्ध रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात दंगल आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १९९३मध्ये गुन्हा दाखल होता. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीमध्ये (Mumbai Riots) सय्यद नादिर शहा अब्बास खान याला रफी किडवाई मार्ग पोलीसानी अटक केली होती. ईस्माइल बिल्डींग, दुसरा माळा, सखाराम लांजेकर मार्ग, शिवडी येथे राहणारा सय्यद हा ३१ वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता, त्यानंतर तो फरार झाला, त्याने न्यायालयात तारखेला जाणे बंद केल्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.

(हेही वाचा देशाने 1 जुलैला ‘खटाखट दिवस’ साजरा केला; PM Narendra Modi यांची टीका)

शिवडी परिसरात सापळा रचून अटक

पोलिसांनी त्याच्या घरी जावून वारंवार चौकशी केली, परंतु त्याच्या कुटूबातील सदस्य त्याच्याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना न देता, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगून टाळाटाळ करीत होते. फरार आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. अखेर पोलिसांनी फरार आरोपीच्या कुटूंबाचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्या मोबाईल क्रमांकाचे कॉल रेकॉर्ड डेटा मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले, तसेच फरार आरोपी हा शिवडी परिसरात कुटूंबाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवडी परिसरात सापळा रचून सय्यद नादीर शहा अब्बास खान याला अटक कऱण्यात आली. (Mumbai Riots)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.