आकाश जाधव हा शक्ती मिल प्रकरणातील आरोपींपैकी एक आहे. या प्रकरणात जामिनावर बाहेर येताच आकाश गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव करून आग्रीपाडा, एनएम जोशी मार्ग या ठिकाणी स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी येथील दुकानदारांकडून हप्ते वसूली करू लागला होता. दुकानदारांना मारहाण तसेच शस्त्रांचा धाक दाखवून खंडण्या उकळू लागला होता. त्याला पोलिसांना अटक केली.
त्याला मुंबईचा डॉन बनायचे होते!
आकाशने अमर नाईक, अरुण गवळी, छोटा राजन यांना आदर्श मानून त्यांच्यासारखा डॉन होण्याची स्वप्न बघितले आणि त्याने आपली एक टोळी निर्माण केली होती. खून, दरोडे, खंडणी, मारहाण, लूटमार यांसारखे गंभीर गुन्हे करण्यास त्याने सुरू केले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याला यापूर्वी देखील अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर पडताच त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली. मला मुंबईचा डॉन बनायचे असल्याचे तो राहत असलेल्या परिसरात लोकांना सांगत होता.
सध्या जामिनावर बाहेर आलेला आकाश जाधव वांद्रे पश्चिम नर्गिस दत्त नगर येथे राहत होता.
(हेही वाचा : मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणताना व्हायरस परत आला! मुख्यमंत्र्यांची कोपरखळी)
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला!
काही दिवसांपूर्वी त्याने नर्गिस दत्त नगर येथे एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना गुन्हे शाखा कक्ष 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने मंगळवारी आकाश आणि त्याचा साथीदार दोघांना अटक केली. त्याच्या साथीदारावर देखील खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.