बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्या प्रकरणातील बहुतांश आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून हे आरोपी संघटितपणे गुन्हे करत असल्याने त्यांच्यावर मकोका कायद्यांतर्गतही कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणातील सातपैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून कारवाईची मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात निवेदन सादर केले होते. आम्ही कोणालाही सोडणार नाही आणि वेळ पडली तर आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करू, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.
(हेही वाचा – काळ्या जादूद्वारे समस्या सोडवण्याचा दावा करून Maulvi Naseem ने केला पीडितेवर अत्याचार)
पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्यासह विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले हा खुनाच्या गुन्ह्यातीलही आरोपी आहे. त्यामुळे खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्याचे कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीआयडी कोठडीत असलेल्या विष्णु चाटेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केज न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.व्ही. पावसकर यांनी दिले आहेत, तर वाल्मीक कराड १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीतच असणार आहे. ११ डिसेंबर रोजी आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा केज पोलिसात नोंद झाला होता.
दोन्ही प्रकरणांत चाटे आरोपी असला तरी त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली आहे. दोन वेळा मिळून न्यायालयाने एकूण १९ दिवस चाटेला पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. सीआयडी व एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली. मुख्य न्या. एस. व्ही. पावसकर यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (MCOCA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community