चोरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर मारहाण आणि अश्लील छळ केल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात आरोप असलेल्या पोलिसालाच त्या पीडित आरोपीच्या नातेवाईकांची माफी मागण्याची वेळ आली. या पोलिस कर्मचाऱ्याचा माफी मागतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. तर या प्रकरणी या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबनही झाले आहे. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सीआयडीकडे सोपवण्याची मागणी केली आहे.
अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावले
अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगावमधील सराफा व्यावसायिकाला अटक केली होती. शाम वर्मा असे या पीडित आरोपीचे नाव. शेगावातून अकोल्यात आणतांना गाडीतच आपल्याला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला गेला. दरम्यान आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोपही तक्रारकर्ता याने केला होता. दरम्यान कस्टडीमधील आरोपींना पीडित आरोपी समोर आणण्यात आलं. यावेळी दोघांना पोलिसांनी पीडित आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावल्याचे गंभीर आरोपही सराफा व्यापारी असलेले आरोपीने केले. यानंतर पायावर जास्त मारहाण झाल्याने पायावर व्रण दिसत होते. व्रण मिटावेत म्हणून व्यापाऱ्याच्या पायावर गरम पाणी म्हणून उकळतं पाणी टाकण्यात आलं. यामुळे व्यापाऱ्याचा पाय गंभीररित्या भाजला गेला, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला.
पोलिस शिपायाला निलंबित केले
अकोल्याच्या जिल्हा अधीक्षक यांनी त्या आरोपीच्या तक्रारीची दखल घेत पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात बदली केली आहे. आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यांवर कोणत्या हेतूने आरोप केले त्यात काही तथ्य आहे का हे तपासून पाहण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी चौकशी समिती नेमली. दरम्यान या प्रकरणी काल शक्ती कांबळे या पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.
(हेही वाचा महाराष्ट्राच्या ‘या’ चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड)
आरोपीच्या नातेवाईकांची माफी मागितल्याचा सीसीटीव्ही समोर
या संपूर्ण प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं असून मारहाण आणि लैंगिक छळाची पोलिसात तक्रार दिल्यानंतर ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप ठेवण्यात आले. त्यापैकी एका पोलिस कर्मचाऱ्याने पीडित सराफा व्यापाऱ्याच्या नातेवाईकाच्या पाया पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. शक्ती कांबळे असे या पोलिस कर्मचऱ्याचे नाव असून या व्हिडिओमध्ये पाया पडतांना दिसत आहे. दरम्यान या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काल निलंबित केलं. त्यामुळे पोलिसांवर उलटा गेम फिरल्याचा प्रकार म्हणावा लागेल.
भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या दोन पोलिसांना निलंबित करण्याची मागणी करत हे प्रकरण सीआयडी कडे सोपवण्याची मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community