BMC : दहिसरमधील नाल्याने बाधित होणाऱ्या जमिनीचे संपादन, विकासकांना दिला विभागून टीडीआरचा लाभ

113

विशेष प्रतिनिधी

BMC : दहिसरमधील (Dahisar) नाल्यांमध्ये बाधित होणाऱ्या आरक्षिण जागेच्या बदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही या जागेच्या हस्तांतरणासाठी आर्थिक भरपाई स्वरुपात मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे २३ कोटी रुपयांचा भार पडणार होता. परंतु आता या आरक्षित जमिनीच्या हस्तांतरणासाठी (Transfer of reserved land) नुकसान भरपाई म्हणून दोन विकासकांना टीडीआर विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  (BMC)

दहिसर येथील नगर भू क्रमांक १४२६/१, ३ अ, ०५,०६, १० ब, तसेच ३१२१/अ, १४६९, १४७० मधून जाणाऱ्या नाल्याने तसेच नाल्यांच्या रुंदीकरणाने बाधित जमिन हस्तांतरित करण्याच्या बदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआर मिळवण्यासाठी मेसर्स टीआर्च कंपनीचे प्रविण मेहता (M/s trc Co. Praveen Mehta) यांच्यावतीने मेसर्स जयनील रियलटर्स एलएलपी (M/s Jayneel Realtors LLP) व मेसर्स अनंत डेवलपर्स एलएलपी (M/s Anant Developers LLP) यांनी महापालिकेकडे ऑगस्ट २०२३मध्ये अर्ज केला होता. य अर्जावर महापालिकेच्यावतीने शासनाकडून स्पष्टीकरण मागवून घेतले. त्यानुसार नगरविकास खात्याचे उपसचिव यांनी जानेवारी २०२४मध्ये या प्रकरणी टीडीआर स्वरुपात नुकसान भरपाई न देता आर्थिक भरपाई स्वरुपात मोबदला दिला जावा अशाप्रकारचे निर्देश दिले होते.

(हेही वाचा – Maharashtra Budget 2025 च्या अर्थसंकल्पात कोणत्या विभागासाठी किती तरतूद? वाचा सविस्तर)

ही सर्व बाधित आरक्षित जमिन ही १४९९८ चौरस मीटर असून यासाठी आर्थिक स्वरुपात नुकसान भरपाई म्हणून महापालिकेला २३ कोटी १८ रुपये देणे आवश्यक होते. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता आर्थिक मोबदला देणे शक्य नसल्याने याऐवजी नुकसान भरपाई रुपांतरीत करून टीडीआर स्वरुपात  जयनिल रिएलटर्स एलएलपी यांना १०९८७.८२ चौरस मीटर आणि अनंत डेव्हलपर्स यांना ४०१०.९९ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाचे टीडीआर प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च टाळून त्याऐवजी टीडीआरचा लाभ दहिसरमधील नाल्यामुळे बाधित होणारी जमिन हस्तांतरीत करण्यासाठी दिला जाणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.