रेल्वे स्थानक परिसरात धूम्रपान करताय? सावधान! नाहीतर…

97

मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम प्रवास देण्यासाठी सतत केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून धूम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात ही धूम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही देखील रेल्वे स्थानक परिसरात धूम्रपान करत असाल तर तुमच्यावर देखील मध्य रेल्वेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

सुरक्षा मोहिमेत ७५१ व्यक्तींवर कारवाई

या मोहिमेत, २४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत, आरपीएफ आणि तिकीट तपासणी कर्मचार्यांनी एकूण ७५१ लोक शोधून काढले आहेत आणि त्यांच्याकडून रु. १,४०,९००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COPTA) – २००३ अंतर्गत ६५५ प्रकरणांमधून रु. १,३०,४००/- आणि भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १६७ अंतर्गत ९६ प्रकरणांतील रु. १०,५००/- च्या दंडाची रक्कम समाविष्ट आहे. मुंबई विभागाने ३१३ प्रकरणांमधून रु. ६१,६००/- वसुली करून शिस्त आणि कायद्याच्या अंमलबजावणीचे उदाहरण ठेवले आहे, त्यानंतर भुसावळ विभागाने १९४ प्रकरणांतून रु. ३५,३००/-; नागपूर विभागाने १०४ प्रकरणांतून रु. १९,८००/- व पुणे विभागाने ७४ प्रकरणांतून रु. १४,१००/- आणि सोलापूर विभागात ६६ प्रकरणांतून रु. १०,१००/- वसुली केले आहेत.

whatsapp

रेल्वेने केले प्रवाशांना असे आवाहन

धूम्रपान विरोधी सुरक्षा मोहिमेचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्यापक मोहीम देखील सुरू केली आहे. रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये धूम्रपानाचे दुष्परिणाम आणि धोके याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर वारंवार घोषणा करणे सुनिश्चित केले जात आहे. धूम्रपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ट्रेनमध्ये आणि रेल्वेच्या परिसरात धूम्रपान करणे COPTA-2003 आणि भारतीय रेल्वे कायद्यानुसार दंडनीय आहे. मध्य रेल्वे, रेल्वे परिसरात आणि गाड्यांमध्ये धूम्रपान टाळण्याचे आणि स्वतःसाठी तसेच इतर प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास करण्याचे प्रवाशांना आवाहन करीत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.