मुंबईत सीटबेल्ट न लावणाऱ्या ९ हजार प्रवाशांवर कारवाई

मुंबईत सीट बेल्ट न लावणाऱ्या तब्बल ९ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३,८४२ चालक, तर ५,१६८ अन्य प्रवाशांचा समावेश आहे.

( हेही वाचा : राज्यात तापमान घसरले! वेण्णा लेक परिसरात पारा ६ अंशावर, पहा क्षणचित्रे )

महामार्गासह प्रमुख शहरांमध्ये होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईत चारचाकी वाहनात मागील आसनावर बसणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीट बेल्ट लावणे अनिवार्य करण्यात आले. याबाबत मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडून १ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत नियमांबाबत जागृती करण्यात आली. त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून नियम भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. त्यात १५ ते १७ नोव्हेंबर या तीन दिवसांत उपरोक्त कारवाई करण्यात आली आहे.

महामार्ग मंत्रालयाच्या आदेशात काय आहे?

  • दुचाकी आणि तीनचाकी वाहनांव्यतिरिक्त सर्व चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावणे आवश्यक, मागील आसनावर सर्व व्यक्तींसाठी सुद्धा सीटबेल्ट व्यवस्था आवश्यक
  • प्रवासी आसनावरील आसन आच्छादन हे सीटबेल्ट लावताना अथवा काढताना अडथळा बनू नये.
  • सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहन चालक आणि मालकाविरोधात कारवाई करताना दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मोटर वाहन कायदा १९८८ कलम १९४(ब) नुसार एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
  • दिल्ली वाहतूक पोलिसांनी सीट बेल्टशी संबंधित नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ ही अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here