हुल्लडबाज गोविंदांवर कारवाई; विनाहेल्मेट फिरणा-या 4 हजार 809 दुचाकीस्वारांवर बडगा

115

दोन वर्षांनंतर मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा होत असताना, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणा-या 6 हजार 144 चालकांवर वाहतूक पोलिसांना कारवाई केली. त्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणा-या 4 हजार 800 हून अधिक जणांवर आणि एका दुचाकीवर तिघांनी प्रवास केल्याने, 531 दुचाकीस्वारांवर बडगा उगारण्यात आला आहे.

विरुद्ध दिशेने वाहन चालवणा-या 581 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. याशिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणा-या 223 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शहरात विनाहेल्मेट प्रवास करणा-या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली. पश्चिम उपनगरात विनाहेल्मेट प्रवास करणा-या सर्वाधिक म्हणजे 1 हजार 631 दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दक्षिण मुंबईत विरुद्ध दिशेने वाहने चालवणा-या 184 चालकांवर कारवाई केली, तर दक्षिण मुंबईत ट्रिपल सीट दुचाकी चालवणा-या 219 जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पूर्व उपनगरांत 100 चालकांवर कारवाई करण्यात आली. दादर- प्रभादेवी परिसरात मोठ्या प्रमाणात राजकीय दहीहंड्या रंगल्या असताना याच परिसरातून सर्वाधिक दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट पकडण्यात आले.

( हेही वाचा: ‘एकदम ओक्केमधी’… शहाजी बापूंचा डायलॉग बनतोय विधिमंडळात वाक्प्रचार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.