मुंबईतील मालवणी (मालाड पश्चिम) परिसरात बांग्लादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
मालवणी (मालाड पश्चिम) परिसरात बांग्लादेशी नागरिक अवैधरित्या स्थलांतर करीत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्याची दखल घेत मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी बांग्लादेशी फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या थाटलेल्या दुकानांचाही प्रश्न चर्चेला आला होता. सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मंत्री लोढा यांनी दिले होते.
(हेही वाचा – Muslim : मुस्लिम धर्म स्वीकारताच बनला जिहादी; प्रेयसीचं डोकं दगडावर ठेचून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला अटक)
त्यानुसार, मालवणी (मालाड पश्चिम) परिसरात बांग्लादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील ६ हजार चौरस मीटर जागा मोकळी झाली आहे. या जागेवर खेळाचे मैदान तयार केले जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community