Unauthorized Schools : मुंबईतील अनधिकृत शाळांवरील कारवाई तुर्तास लांबणीवर

१६९ अनधिकृत शाळांची यादी महापालिका शिक्षण विभागाकडून जाहीर

116
Unauthorized Schools : मुंबईतील अनधिकृत शाळांवरील कारवाई तुर्तास लांबणीवर
Unauthorized Schools : मुंबईतील अनधिकृत शाळांवरील कारवाई तुर्तास लांबणीवर

मुंबई महापालिकेची मान्यता न घेता मुंबईत तब्बल २१८ अनधिकृत शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला घेतला होता, मात्र या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर पडला असून शालेय शिक्षण मंत्री आणि मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत याविषयी बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, २१८ शाळांपैकी १८६ शाळा या मान्यतेशिवाय चालत असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईतील आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी ५० शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नावाची घोषणा महापालिका सह आयुक्त गंगाधरण डी यांनी घोषित केली. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी राजू तडवी हे उपस्थित होते.यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजू तडवी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, एकूण २१८ शाळा या महापालिकेच्या मान्यतेशिवाय अनधिकृत सुरू होत्या म्हणून त्यांची माहिती घेवून त्या शाळांची नावे जाहीर केली होती; परंतु आता ही संख्या १८६ एवढी असून काही शाळा बंद झाल्या आहेत. या अनधिकृत शाळांचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात आल्याने शाळांवरील कारवाई तूर्तास स्थगित ठेवली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री उदय सामंत हे यांच्यासमवेत मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.त्यामुळे तोपर्यंत हा निर्णय लांबणीवर पडला आहे.या शाळांच्या विरोधात एफआयआर नोंदवून पुढील कारवाई करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Talathi Exam : अमरावतीत तलाठी भरती परीक्षेत पुन्हा हायटेक कॉपीची घटना, एकाला अटक)

मागील वर्षी मे महिन्यांत म्हणजे २०२२ मध्ये जेव्हा मुंबईतील १६९ अनधिकृत शाळांची यादी महापालिका शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्याच्या तत्कालीन मुख्यमत्र्यांना निवेदन देत, आपण लवकरात लवकर या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांवर व शाळांवर कठोर कारवाई करून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात.अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,असा इशारा दिला होता. त्यानंतर हा मुद्दा प्रचंड तापला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.