सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १४ हजार महाभागांवर कारवाई! 

सर्वाधिक दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातून करण्यात आली असून, ती ०४ लाख ७० हजार २०० रुपये इतकी आहे.

61

मुंबईत आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेच्या माध्यमातून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात येतो. या कारवाई अंतर्गत गेल्या सुमारे ६ महिन्यांत १४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये २८ लाख ६७ हजार ९०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

कुर्ला परिसरात सर्वाधिक दंड वसुली!

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४६१ अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करीत असते. याच उपविधीतील क्रमांक ४.५ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तींकडून रुपये २००/- इतकी दंड वसुली करण्यात येते. यानुसार गेल्या सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीत २८ लाख ६७ हजार ९०० रुपये इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातून करण्यात आली असून, ती ०४ लाख ७० हजार २०० रुपये इतकी आहे. या खालोखाल ‘ए’ विभागातून ०३ लाख २९ हजार ८०० रुपये, तर ‘सी’ विभागातून ०२ लाख ७१ हजार ४०० रुपये इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

(हेही वाचा : कोरोना चाचण्या घाटल्याबरोबर घटली रुग्ण संख्या!)

दंडाच्या रकमेत करणार वाढ!

रस्त्यांवर थुंकणााऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. मात्र, ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून दोनशे रुपयेच असल्याने या रकमेत वाढ करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या अनुषंगाने ही दंड रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आवश्यक ती पुढील कार्यवाही महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती उप आयुक्त संजोग कबरे यांनी दिली आहे.

वसूल करण्यात आलेल्या विभागनिहाय दंड रकमेची माहिती

  • ए विभाग – रुपये ३,२९,८००/-
  • बी विभाग – रुपये १,९५,६००/-
  • सी विभाग – रुपये २,७१,४००/-
  • डी विभाग – रुपये १,२५,०००/-
  • ई विभाग – रुपये २०,०००/-
  • एफ दक्षिण विभाग – रुपये २,१७,४००/-
  • एफ उत्तर विभाग – रुपये ५०,६००/-
  • जी दक्षिण विभाग – रुपये २६,०००/-
  • जी उत्तर विभाग – रुपये २५,९००/-
  • एच पूर्व विभाग – रुपये १,७१,४००/-
  • एच पश्चिम विभाग – रुपये २५,८००/-
  • के पूर्व विभाग – रुपये २७,०००/-
  • के पश्चिम विभाग – रुपये ९५,६००/-
  • पी दक्षिण विभाग – रुपये ६९,८००/-
  • पी उत्तर विभाग – रुपये २,६१,४००/-
  • आर दक्षिण विभाग – रुपये ३३,५००/-
  • आर मध्य विभाग – रुपये ४३,८००/-
  • आर उत्तर विभाग – रुपये १,०८,४००/-
  • एल विभाग – रुपये ४,७०,२००/-
  • एम पूर्व विभाग – रुपये १९,२००/-
  • एम पश्चिम विभाग – रुपये १,०६,८००/-
  • एन विभाग – रुपये ७१,३००/-
  • एस विभाग – रुपये ९०,४००/-
  • टी विभाग – रुपये ११,६००/
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.