माटुंगा पश्चिम येथील स्टेटस हॉटलच्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी महापालिकेच्यावतीने हातोडा चालवण्यात आला आहे. या हॉटलमधील अनधिकृत बांधकामावर न्यायालयाच्या निर्देशानुसार गुरुवारी येथील अनधिकृत प्रवेशद्वार तोडण्यात आले असून त्यानंतर आतील बांधकामावर हातोडा चालवण्णयात आला आहे.मात्र, ही कारवाई सुरु असतानाच महापालिकेच्या विधी विभागाच्या सूचनेनुसार ही कारवाई तात्पुरती स्थगिती आली आहे. त्यामुळे ज्या हॉटेलच्या मालकाने येथील पुरातन दत्त मंदिर पाडण्याचा कुटील डाव रचला होता, त्यांच्यावरच आता गुरु देव दत्त कोपले असून त्यांच्या बांधकामावर आता महापालिकेचा हातोडा पडला आहे. (Unauthorized Construction)
माटुंगा पश्चिम येथील टी.एच. कटारिया मार्गावरील स्टेटस हॉटेलमध्ये काही अनधिकृत बांधकाम असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.या बाबत महापालिकेच्या जी उत्तर विभागाने नोटीस जारी केल्यानंतर याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच यातील अनधिकृत बांधकाम दंड आकारुन नियमित करण्याची संधी महापालिकेने संबंधित हॉटेलला दिली होती. परंतु या कालावधीत संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई न केल्याने महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर गुरुवारी कारवाई करण्यात आली. (Unauthorized Construction)
(हेही वाचा – Kargil Vijay Divas : राज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा)
महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या इमारत कारखाना विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये हॉटेलकडे जाणारा लोखंडी प्रवेशद्वार तोडण्यात आला आहे. तसेच हॉटेलच्या अंतर्गत भागातील बांधकाम तोडण्यात आले आहे. तोडक कारवाई सुर असतानाच यासंदर्भात न्यायालयात याचिकेवर त्याच दिवशी सुनावणी असल्याचे विधी विभागाकडून महापालिकेच्या या पथकाला कळवण्यात आल्याने ही कारवाई तात्पुरती स्थगिती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बार आणि रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत ही कारवाई केल्याचेही बोलले जात आहे. (Unauthorized Construction)
या हॉटेलच्या मागे पुरातन दत्त मंदिर असून या मंदिराची जागेवर हॉटेलने दावा ठोकला होता, तसेच येथील इमारत धोकादायक दाखवून हे मंदिर बंद करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यामुळे या विरोधात मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मोठा उठाव करत याला विरोध केला होता. त्यामुळे या हॉटेलवर कारवाई झाल्याने या मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. (Unauthorized Construction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community