निलंबनाचे सत्र सुरुच,आकडा ‘हजार’च्यावर

60

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच आहे. महागाई भत्ता आणि घरभाडे वाढीबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत अद्याप तोडगा निघू शकला नाही. मागील ५ वर्षांमध्ये दरवर्षी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला. तरीही त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांनी यंदाच्या वर्षीही २७ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला आहे. विशेष म्हणजे हा संप ८ नोव्हेंबरपासून राज्यभरातील आगारांमध्ये शंभर टक्के यशस्वीपणे सुरु आहे. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला २०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. अशापरिस्थितीत एसटी महामंडळाकडून कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले होते. अजूनही निलंबनाचे सत्र सुरुच आहे, गुरुवारी आणखी 1 हजार 135 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.

इतक्या आगारांवर करण्यात आली कारवाई

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते, अशा संपावर गेलेल्या ३७६ कर्मचाऱ्यांचे एसटी महामंडळाकडून कारवाई केली होती. आता गुरुवारी या कारवाईदरम्यान, राज्यातील 122 आगारांसह इतर कार्यशाळांवरही कारवाई करण्यात आली आहे. या आगारांतील कर्मचाऱ्यांचे निलंबन महामंडळाकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतलेला नाही.

(हेही वाचा :प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन नको, मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन )

विभागवार  निलंबित कर्मचा-यांची संख्या

ST 5

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.