Mumbai Hawkers : फेरीवाल्यांवर धडक कारवाई; एका आठवड्यात ७१३ हातगाड्या, १,०३७ सिलिंडर जप्त

अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत कारवाईचा धडाका

2109
Mumbai Hawkers : फेरीवाल्यांवर धडक कारवाई; एका आठवड्यात ७१३ हातगाड्या, १,०३७ सिलिंडर जप्त

मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत दिनांक १८ ते २४ जून २०२४ या एका आठवड्यात विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही पार पडली. या कार्यवाहीत फेरीवाल्यांकडून सुमारे ३ हजार साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात ७१३ चारचाकी हातगाड्या, १ हजार ०३७ घरगुती गॅस सिलिंडर आणि १ हजार २४६ व इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. (Mumbai Hawkers)

मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते. मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका आयुक्त यांचे सभागृहात गुरुवारी २७ जून २०२४ रोजी सायंकाळी पार पडली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी अध्यक्षस्‍थानी होते. (Mumbai Hawkers)

New Project 2024 06 28T163619.750

(हेही वाचा – Mumbai Hawkers : बोरीवलीतील एस व्ही रोडसह आता स्कायवॉकही फेरीवाल्यांना आंदण, सांगा लोकांनी चालायचे कुठून?)

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यांवर कठोर करावी; अनधिकृत फेरीवालेमुक्त मुंबई करावी, जेणेकरून मुंबईकर नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल; पादचाऱयांसाठी पदपथ मोकळे करावेत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्‍यानुसार, अतिक्रमण निर्मूलन कारवाईला अधिक वेग देण्‍यात आला आहे. मुंबईतील विविध विभागांमध्ये गत आठवडाभरात झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत. (Mumbai Hawkers)

मुंबईतील नागरिकांना पदपथ सहजपणे वापरता यावेत, तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पदपथ अतिक्रमण मुक्त राहतील, या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. मुंबईतील पदपथ नागरिकांना वापरासाठी नियमितपणे उपलब्ध रहावेत तसेच आरोग्याच्या दृष्टीने दर्जेदार अन्न मुंबईकरांना मिळावे, उघड्यावर व अस्वच्छ रितीने अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर वचक रहावा, यासाठी सातत्याने ही मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी दिली. (Mumbai Hawkers)

New Project 2024 06 28T163701.205

(हेही वाचा – Maharashtra Budget 2024 : सरकार देणार ३ गॅस सिलिंडर मोफत; कोण असतील अन्नपूर्णा योजनेची पात्र कुटुंबे ?)

या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साधनसामुग्रीचा तपशील खालीलप्रमाणे –
  • जप्त साधनांची एकूण संख्या – २,९९६
  • चारचाकी हातगाड्या – ७१३
  • सिलिंडर – १,०३७
  • स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारचे साहित्य – १,२४६ 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.