Action on Hawkers : फेरीवाल्यांवरील कारवाई होणार अधिक तीव्र; १५ सप्टेंबर नंतर पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याची होणार नाही हिंमत!

3143
Action on Hawkers : फेरीवाल्यांवरील कारवाई होणार अधिक तीव्र; १५ सप्टेंबर नंतर पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याची होणार नाही हिंमत!
Action on Hawkers : फेरीवाल्यांवरील कारवाई होणार अधिक तीव्र; १५ सप्टेंबर नंतर पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याची होणार नाही हिंमत!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबईतील फेरीवाल्यांनी विरोधातील कारवाई आता अधिक तीव्र होणार  आहे.  या कारवाईतील सातत्य कायम राहावे आणि फेरीवाला मुक्त परिसर राहावा यासाठी महापालिकेच्या वतीने अनुज्ञापन/ परवाना निरीक्षक ( लायसन्स इन्स्पेक्टर) यांची पदे भरण्यात येणार आहे. महापालिकेत सध्या परवाना निरीक्षक हे २०७ असून अजून ११८ परवाना निरीक्षकांची पद  ही महापालिकेच्या लिपिक संवर्गातून अंतर्गत भरती द्वारे भरली जाणार आहेत. त्यामुळे याची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेच्या परवाना विभागात उत्तीर्ण होणाऱ्या परवाना  निरीक्षकांची नियुक्ती करून ही कारवाई अधिक  तीव्र करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. (Action on Hawkers)
मुंबईत मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांवर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एका बाजुला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकांपासून १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून  महापालिकेनं सध्या मुंबईत पहिल्या टप्प्यात  २० ठिकाणे निश्चित केली आहेत. ज्यात  रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या ठिकाणांसह दूरच्या ठिकाणांचाही समावेश आहे. (Action on Hawkers)
 या २० ठिकाणांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे, अंधेरी, मालाड, बोरीवली, दहिसर, कुर्ला,घाटकोपर आदी रेल्वे स्थानकाच्या जवळील परिसरांचा समावेश आहे. तर कुलाबा कॉजवे, लालबाग राजा परिसर, वांद्रे लिकींग रोड, हिल रोड, मोहम्मद अली मार्ग लालबहादूर शास्त्री मार्ग आदी रेल्वे स्थानकांपासून दूर  असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे. (Action on Hawkers)
मात्र,  या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर त्याठिकाणी देखरेख  ठेवणे हे मनुष्यबळा अभावी महापालिका प्रशासन कमी पडत आहे. सध्या महापालिकेच्या अनुज्ञापन विभागात अर्थात परवाना विभागात ११८ परवाना निरिक्षक यांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याच्या दृष्टीकोनातून प्रक्रिया सुरू झाली असून ही पदे महापालिकेच्या लिपिक वर्गाच्या कर्मचाऱ्यांअधून अंतर्गत भरती प्रक्रियेद्वारे  भरली जाणार आहे. यासाठी  महापालिकेच्या कार्यरत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतो आणि याची परीक्षा येत्या ४ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा झाल्यास येत्या १५ सप्टेंबर पर्यंत ही पदे भरून त्यांची नियुक्ती केली जाईल. (Action on Hawkers)
फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी आणि जनतेला रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करून देण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशानुसार अतिरीक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांच्या नेतृत्वाखाली परवाना अधीक्षक काटे आणि अतिक्रमण विभाग यांच्या मदतीने ही कारवाई तीव्र करण्यासाठी रिक्त पदे भरण्यास आवश्यक  वाहने उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे भविष्यात ही कारवाई पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त देखरेखीखाली अधिक तीव्र होईल आणि दुसऱ्या टप्प्यातील काही भागांचा त्यात समावेश केला जाईल असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले जात आहे. (Action on Hawkers)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.