राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांना, कोणत्याही दबावाखाली न येता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर पहिली कारवाई ही वांद्र्यातील बेहरामपाड्यात करुन दाखवली जाणार का, असा सवाल सोशल मीडियावर केला जात आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे किमान महापालिका अधिका-यांनी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी बेहराम पाड्यापासूनच या कारवाईला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
या भागांत अनधिकृत बांधकामे
वांद्रे पूर्व येथील बेहराम पाडा, मालाडमधील मालवणी, कांदिवली, दहिसर गणपत पाटील नगर, चिता कॅम्प, गोवंडी, शिवाजी नगर, बैगनवाडी, कुर्ला, खार, धारावी आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यात आता १४ फुटांच्यावर वाढीव बांधकाम करत चार ते पाच मजले वाढवले जात आहेत.
(हेही वाचाः अनधिकृत बांधकामांची गय करू नका, बिनधास्त तोडा! मुख्यमंत्र्यांचा आदेश)
कारवाई पडली थंड
तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील ज्या-ज्या भागांमध्ये घरांचे बांधकाम १४ फुटांपेक्षा अधिक आहे, त्या सर्वांचा सर्वे करण्यात यावा आणि त्यानंतर या वाढीव बांधकामावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाला दिले होते. परंतु सुरुवातीला सर्वे करण्यात वेळ घालवल्यानंतर, वाढीव बांधकामांवर कारवाईचे निर्देश असूनही काही मोजक्याच भागांमधील घरांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुढे नगरसेवकांनी विरोध केल्यांनतर ही कारवाई थंड पडली.
१४ फुटांवरील बांधकामांवर कारवाई करावी
मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असतानाच, आता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांनाच हे निर्देश देत एकप्रकारे मोठा आधार दिला आहे. त्यातच १४ फुटांवरील वाढीव बांधकाम तोडण्याचे स्पष्ट निर्देश तत्कालीन आयुक्तांनी काढले होते. त्यामुळे अनधिकृत बांधकामे तोडण्याची हिंमत दाखवताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी १४ फुटांवरील बांधकामांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
(हेही वाचाः मुंबईत ‘या’ भागांमध्ये पाणीकपात! कधी? वाचा)
मुस्लिम मोहल्ल्यांपासून कारवाई सुरू करा
मात्र, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना अनेक मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे अधिकारी भीतीच्या छायेखाली असल्याने ते तिथे दुर्लक्ष करतात. परिणामी मुस्लिम बहुल भागांमध्येच झोपड्यांवर चार ते पाच मजले चढवले गेले आहेत. वांद्र्यातील बेहराम पाडा हे अनधिकृत बांधकामांचे प्रेरणास्थान असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पहिली कारवाई ही बेहराम पाड्यापासूच सुरु केली जावी, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत.
कशी करणार कारवाई?
बेहराम पाडा हा एच पूर्व विभागात मोडत असून, या विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्याकडे एल विभागाचीही जबाबदारी आहे. विशेष म्हणजे वांद्रे व खारमध्ये ज्याप्रकारे अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत, तशीच अनधिकृत बांधकामे कुर्ला विभागातही आहेत. परंतु ज्या भागांमध्ये सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे आहेत, त्याच विभागांमध्ये सक्षम सहायक आयुक्त व पदनिर्देशित अधिकारी नाहीत. त्यामुळे महापालिका कुणाच्या भरवशावर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार आहे, असाही सवाल केला जात आहे.
(हेही वाचाः कानपूर मध्ये ‘बिल जिहाद’! असा होत आहे मुस्लिम धर्माचा प्रचार)
Join Our WhatsApp Community