कोणत्याही कंपनीत कर्मचाऱ्यांच्या सुट्या हा विषय कायम चर्चेत असतो. प्रत्येक जण एक एक सुटीसाठी झगडत असतो. वर्षअखेर सुट्या बाकी असतील तर त्याचा मोबदला मिळवा म्हणून कर्मचारी कंपनीकडे दावा करतात, मात्र जगात अशी एक कंपनी आहे, जी कर्मचाऱ्यांना हव्या तितक्या सुट्या देते, त्याचा मोबदलाही देते. न्यूझीलंड येथील ऍक्शन स्टेप अशी ही सॉफ्टवेअर कंपनी आहे.
४ दिवसांचा आठवडा!
आजारासाठी सुट्या असो, प्रसूती रजा असो अथवा अन्य कारणासाठीच्या सुट्या असो. कर्मचाऱ्यांना तीन महिने कोणत्याही कारणांशिवाय ही कंपनी सुट्या देते, मात्र त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला प्रामाणिकपणे काम करावे लागेल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. आमचा कर्मचाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते कंपनीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करतील, असे कंपनीचे उपाध्यक्ष स्टीव्ह मेहयू म्हणाले. या कंपनीने ४ दिवसांचा कामकाजाचा आठवडा ठरवला आहे, हा नियम कंपनीने २०१८ साली लागू केला आहे. आठवड्यातील कामाच्या एकूण ३२ तासांमधून उत्तम उत्पादकता निर्माण करता येऊ शकते, असे निरीक्षण या कंपनीचे आहे. नेटप्लीक्स, लिंकदिन आणि व्हिज्युअलसॉफ्ट या कंपन्यांनीही सुट्यांबाबत हेच धोरण स्विकारण्याच्या विचारात आहे.
(हेही वाचा आनंदाची बातमी! एसी लोकलबरोबरच फर्स्ट क्लासही स्वस्त)
Join Our WhatsApp Community