Matunga रेल्वे स्थानक आणि फुल बाजार परिसरातील ५२ दुकानांवर कारवाई

427

मुंबई, विशेष प्रतिनिधी

माटुंगा मध्य रेल्वे स्थानक (Matunga Central Railway Station) परिसर आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार (Full market) परिसरातील ५२ अनधिकृत दुकानांवर (BMC action against unauthorized shops) मुंबई महानगरपालिकेच्या एफ (उत्तर) (F North) विभागाच्या वतीने गुरुवारी ०६ मार्च २०२५ कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत २२ दुकाने आणि अतिक्रमण केलेल्या ३० दुकांनाचा समावेश आहे. (Matunga)

(हेही वाचा – मराठी भाषेविषयी Bhaiyyaji Joshi यांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…)

उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला (Commissioner Nitin Shukla) यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरात (Matunga Railway Station Flower Market) पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, एफ (उत्तर) विभागाच्या वतीने निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत सुमारे ३०० मीटर परिसरातील अनधिकृत २२  दुकाने तसेच अतिक्रमण करण्यात आलेली ३० दुकाने निष्कासित करण्यात आली. परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा – मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची विधानसभेत ग्वाही)

या कारवाईसाठी सुमारे १०५ मनुष्यबळासह २ जेसीबी व ६ डंपर आणि २ अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता. महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदाची प्रथच सुत्रे हाती घेतल्यानंतर शुक्ला यांनी माटुंगा रेल्वे स्टेशन परिसरासह येथील भांडारकर मार्गावरील फुलबाजारातील गाळेधारकांना लक्ष्य केल्याने आता हे सहायक आयुक्त आता विभागातील कुठल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून लक्ष वेधून घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.