दिवाळीच्या सणात रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांवर मुंबईत कारवाई करण्यात आली असून ७८४ गुन्हे दाखल केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली असून सर्वाधिक गुन्हे पश्चिम आणि उत्तर उपनगरात करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Diwali Firecrackers)
मुंबईतील हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता वाढल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने खुद्द त्याची दखल घेतली आहे. दिवाळीच्या सणात मुंबईत होणाऱ्या फटाक्याच्या आतिषबाजीमुळे हवेतील प्रदूषण वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे उच्च न्यायालयाने दिवाळी सणात फटाके फोडण्यावर वेळेचे निर्बंध टाकले आहे, रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यात यावे असा आदेश उच्च न्यायालयाने काढला होता. मुंबई पोलिसांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येत असून पोलिसां कडून मुंबईत शुक्रवार पासून कारवाईला सुरुवात केली आहे. (Diwali Firecrackers)
(हेही वाचा – INDI आघाडीत बिघाडी? तिसऱ्या आघाडीची तयारी…)
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मुंबईत मागील तीन दिवसात मुंबई पोलिसांकडून ८०६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईतील पश्चिम आणि उत्तर उपनगरात सर्वाधिक कारवाई करण्यात आलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Diwali Firecrackers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community