Western Railway : फुकटात गारेगार प्रवास करणाऱ्या ९३४ जणांवर कारवाई

सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीपेक्षा जास्त दर असून ही पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये प्रवासी गर्दी दिवसागणिक वाढती आहे.

168
Western Railway : फुकटात गारेगार प्रवास करणाऱ्या ९३४ जणांवर कारवाई
Western Railway : फुकटात गारेगार प्रवास करणाऱ्या ९३४ जणांवर कारवाई

मध्य रेल्वे च्या दादर स्टेशन वर काहीच दिवसांपूर्वी टीसींची संपूर्ण फौज विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. त्याच प्रमाणे पश्चिम रेल्वेच्या टीसींनी वांद्रे स्थानकातुन एसीलोकलमधून एकाच दिवसात ९३४ विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामुळे केवळ एसी लोकलमध्ये तपासणीचा आग्रह नियमित तिकीट-पासधारक प्रवाशांचा असल्याने पश्चिम रेल्वेने कारवाई केली. (Western Railway)
पश्चिम रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान मुंबई उपनगरी लोकलमधून ५३ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत २.३४ कोटींचा दंड वसूल केला आहे. यात एसी लोकलमधील फुकट्यांची संख्या ३८ हजार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फुकट्यांवरील कारवाईत १४० टक्यांहून अधिक वाढ झाल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीपेक्षा जास्त दर असून ही पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये प्रवासी गर्दी दिवसागणिक वाढती आहे. विरार, वसई रोड, भाईंरदर, बोरिवली, अंधेरी स्थानकात मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवासी एसी लोकलमध्ये प्रवेश करून वांद्रे स्थानकात उतरतात.

(हेही वाचा : D. Y. Chandrachud : २० वर्षांत महिला न्यायाधीशांची संख्या वाढेल, सरन्यायाधीशांनी दिली आनंदाची बातमी)

नियमित तिकीट-पासधारकांच्या वाढत्या तक्रारींसाठी एकाच एसी लोकलमध्ये शंभराहून अधिक तपासनीसांनी प्रवेश करून प्रवाशांची तपासणी करण्याची पद्धत पश्चिम रेल्वेने सुरू केली आहे. वांद्रे स्थानकात पश्चिम रेल्वेच्या आठ एसी लोकलची तपासणी करण्यात आली. यावेळी ९३४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत २ लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला, असे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.