कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल!

कोविडमुळे अनाथ झालेल्या  बालकांना संपूर्ण संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे.

63

कोविड-१९ या महामारीच्या कालावधीमध्ये ज्या बालकांचे पालक मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रुग्णालयामध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होवू शकत नाही, अशा बालकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना केलेली आहे. नागरिकांना अशा संकटामध्ये सापडलेली बालके आढळून आल्यास अथवा माहिती मिळाल्यास कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय कृती दल मुंबई शहर राजीव निवतकर यांनी केले आहे.

( हेही वाचा : रेमडेसिवीरचा तुटवडा मग राजकारण्यांकडे साठा कसा?   )

यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले, या बालकांना संपूर्ण संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी सतर्कतेने काम करावे. कोविड रुग्णांना दाखल करून घेताना फॉर्मवर त्यांच्या मुलांबाबत सविस्तर माहिती भरून घ्यावी. अशा घटना यापूर्वी घडल्या असतील त्याबाबतही माहिती जमा करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीस समितीचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांचे प्रतिनिधी, सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जे.जे. रुग्णालय तसेच मनपा आरोग्य सेवा, अध्यक्ष बाल कल्याण समिती मुंबई शहर १ व २ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते.

संपर्क –
चाईल्डलाईन हेल्पलाइन – १०९८ (२४तास)
पत्ता –  जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई शहर ०२२-२४९२२४८४
बाल कल्याण समिती, मुंबई शहर १ व २:- ९३२४५५३९७२, ९८६७७२८९९४

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.