उत्तराखंड सरकारने १००० अवैध मुसलमानांच्या मजारांची एक यादी जाहीर केली आहे. यात उल्लेख केलेल्या मजारी सरकारी जागेवर अवैधपणे बांधण्यात आले आहेत. जर या मजारी सहा महिन्यांच्या आता हटवण्यात आल्या नाहीत तर त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिला.
मजारीच्या मानवाचे अवशेष सापडले
मुख्यमंत्री धामी यांनी ७ एप्रिलला कालाढूंगीच्या महाविद्यालयात बोलताना म्हणाले की, उत्तराखंडात १,००० हून अधिक मजारी बांधण्यात आल्या आहेत. इतकच नाही तर मागे प्रत्यक्ष कारवाई दरम्यान जेव्हा काही मजारी अर्थात थडग्यांकडे खोदकाम करण्यात आले, तेव्हा त्याखाली मानवाचे अवशेष सापडले नाहीत. त्यामुळे ते थडगी बनावट आहेत, अशी शंका येते.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान)
देवभूमीत लॅंड जिहाद स्वीकार्य नाही
या देवभूमीत लॅंड जिहाद सारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाणार नाही. उत्तराखंड सरकार कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरूद्ध नाही, मात्र ते अशा प्रकारचे बेकायदेशीर अतिक्रमण स्वीकारणार नाही. २०२२ च्या मे महिन्यात मुख्यमंत्र्यांनी डोंगरावरच्या अवैध मजारांबद्दल चिंता व्यक्त केली होती. तर डिसेंबर २०२२ आणि मार्च २०२३ मध्ये अशा प्रकारच्या ४१ अवैध मजारांवर पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली होती. आता जर त्या जाहीर केलेल्या यादींमधील मजार संबंधित व्यक्तींनी हलवली नाही तर त्यावरून बुलडोजर चालवण्यात येईल, असे मुख्यमंत्री धामी म्हणाले.
Join Our WhatsApp Community