कुमार पल्लाना हे भारतीय-अमेरिकन चरित्र अभिनेते आणि vaudevillian होते. vaudevillian (वाडेव्हिलियन) हा विविध प्रकारच्या मनोरंजनाचा एक नाट्य प्रकार आहे जो १९व्या शतकाच्या शेवटी फ्रान्समध्ये सुरू झाला. हा विशेषतः मनोवैज्ञानिक किंवा नैतिक हेतू नसलेला विनोदाचा प्रकार होता. ‘द रॉयल टेनेनबाउम्स’ मध्ये बटलरची भूमिका साकारणारा आणि वेस अँडरसनच्या इतर चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा भारतीय अभिनेता, अशी ओळख त्यांना लाभली होती.
कुमार पल्लाना यांचा जन्म २३ डिसेंबर १९१८ रोजी इंदूर येथे झाला. १९४६ मध्ये ते युनायटेड स्टेट्सला गेले आणि ते टेक्सासमध्ये स्थायिक झाले. त्यांनी भारतभरात २० वर्षे कला सादर केली आणि योग स्टुडिओ सुरू केला. पल्लानाचे लग्न रंजना जेठवा यांच्याशी झाले आणि त्यांना मुलगा दीपक आणि मुलगी संध्या ही दोन मुले झाली.
(हेही वाचा – Virat Kohli Returns From SA : घरगुती कारणामुळे विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघारी )
पल्लाना यांनी बॉटल रॉकेट, रशमोअर, द रॉयल टेनेनबॉम्स आणि द दार्जिलिंग लिमिटेड या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. पल्लाना यांनी अंजाना अंजानी आणि अनदर अर्थ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी मिकी माऊस क्लबमध्ये प्लेट स्पिनर आणि जगलर म्हणून काम केले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी कॅलिफोर्निया येथे १० ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.
हेही पहा –