Actress Nayanthara ने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मागितली माफी

देशभरातील हिंदू धर्मियांकडून कडाडून विरोध सुरु झाल्यावर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आलेल्या Annapoorani या चित्रपटाच्या विरोधात रोष अजूनही वाढतच आहे. देशातील विविध राज्यांमध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत आहे. अशातच आता या चित्रपटातील अभिनेत्री नायनथाराने 'जय श्री राम' म्हणत माफी मागितली आहे.

257
Actress Nayanthara ने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मागितली माफी

‘अन्नपूर्णी’ या तामिळ चित्रपटामधून हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल चित्रपटातील अभिनेत्री नयनथाराने (Actress Nayanthara) माफी मागितली आहे. गुरुवारी (१८ जानेवारी) तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट मधून तिचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे सांगितले आहे.

नयनथाराने (Actress Nayanthara) ‘जय श्री राम’ म्हणत माफी मागितली आणि सांगितले की चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘सकारात्मक संदेश’ देण्याचा प्रयत्न केला, तथापि, या प्रक्रियेत त्यांनी अनवधानाने भावना दुखावल्या असतील तर माफ करा.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशमधील कैद्यांनी बनविले ५१ हजार दिवे, ४० हजार ध्वज)

नेमकं काय म्हणाली नयनथारा ?

तिने या पोस्टची (Actress Nayanthara) सुरुवात ही जय श्रीराम असे बोलून केली आहे. ‘मी अतिशय जड अंत:करणाने अन्नपूर्णी चित्रपटाशी संबंधीत ही नोट लिहिली आहे. हा चित्रपट एक असा चित्रपट आहे जो लोकांना आयुष्यात पुढे जाऊन काही तरी योग्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. एक सकारात्मक संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण चुकून काही लोकांच्या भावना (Actress Nayanthara) दुखावल्या गेल्या. आम्हाला वाटले नव्हते की एक सेंसॉर सिनेमा जो आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता तो अचानक ओटीटीवरुन हटवण्यात येईल’ या आशयाची पोस्ट नयनथाराने केली आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : … आणि पंतप्रधान मोदी झाले भावूक)

आमचा देवावर विश्वास – 

‘मी किंवा माझ्या टीमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता. आम्ही (Actress Nayanthara) सगळे भावनांचा आदर करतो कारण आमचा देवावर विश्वास आहे. आम्ही देशातील अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेतले आहे. त्यामुळे आम्ही मुद्दाम तर केलेले नाही. ज्यांना असे वाटते की माझ्याकडून चूक झाली आहे त्यांची मी मनापासून माफी मागते.’

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir IMD : अयोध्येतील हवामानाचे अंदाज कळण्यासाठी स्वतंत्र वेबपेज; भारतीय हवामान विभागाची माहिती)

Annapoorani चित्रपट –

Annapoorani या चित्रपटाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि प्रभू रामाचा अपमान केल्याचा आरोप आहे. तसेच चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आले आहे. अन्नपूर्णी चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याच वेळी, 29 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आले. विरोध आणि अनेक पोलिस तक्रारींनंतर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे. दुसरीकडे बजरंग दल आणि हिंदू आयटी सेलनेही अभिनेत्री नयनतारा आणि इतरांविरोधात मुंबईत दोन तक्रारी केल्या आहेत. (Actress Nayanthara)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.