Adani to Enter Petrochemicals : अदानी समुह आता उतरणार पेट्रोकेमिकल उद्योगात, थायलंडमधील कंपनीशी करार

Adani to Enter Petrochemicals : नवीन उपक्रमाला व्हॅलर पेट्रोकेमिकल लिमिटेड असं नाव देण्यात आलं आहे.

40
Adani to Enter Petrochemicals : अदानी समुह आता उतरणार पेट्रोकेमिकल उद्योगात, थायलंडमधील कंपनीशी करार
  • ऋजुता लुकतुके

अदानी समूह आता पेट्रोकेमिकल क्षेत्रात मोठी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. यासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने थायलंडच्या इंडोरामा रिसोर्सेस लिमिटेडसोबत भागिदारी केली आहे. या संयुक्त उपक्रमाला व्हॅलर पेट्रोकेमिकल्स लिमिटेड असे नाव देण्यात आलं आहे. संयुक्त कंपनीत दोन्ही कंपन्यांची ५० टक्के भागिदारी असेल. अदानी समुहाने ६ जानेवारी भारतीय शेअर बाजारांना ही माहिती दिली आहे. (Adani to Enter Petrochemicals)

एक्सचेंज फाइलिंगनुसार, व्हीपीएल कंपनी भारतात तेल शुद्धीकरण प्रकल्प, पेट्रोकेमिकल आणि केमिकल प्रकल्प उभारणार आहे. समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी २०२२ मध्येच तसं सुतोवाच केलं होतं. गुजरातमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी समुह ४ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या बातमीनंतर शेअर बाजारात अदानी एंटरप्रायजेसच्या समभागांना मोठी मागणी आहे आणि मंगळवारी शेअर बाजारात अदानी समुहाचे शेअर दीड टक्क्यांनी वर आले आहेत. (Adani to Enter Petrochemicals)

(हेही वाचा – Torres चा भांडाफोड कसा झाला, काय होती टोरेसची मोडस ऑपरेंडी?)

अदानी पेट्रोकेमिकल्स गुजरातमधील मुंद्रा येथे पेट्रोकेमिकल क्लस्टर बनवत आहे, ज्यामध्ये पीव्हीसी प्लांटदेखील समाविष्ट असेल. या प्लांटची एकूण किंमत अंदाजे ३५,००० कोटी रुपये आहे. याआधीही अदानी समूहाने जर्मन रासायनिक कंपनी बीएएसफ सोबत भागीदारी करून गुजरातमधील मुंद्रा येथे रासायनिक कारखाना उभारला होता. तथापि, बीएएसएफ सह भागीदारीसह कंपनीच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Adani to Enter Petrochemicals)

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी अदानी समूहाचा एक भाग आहे. गौतम अदानी यांनी १९८८ मध्ये एंटरप्रायजेसची स्थापना केली. कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानी आहेत, व्यवस्थापकीय संचालक आहेत राजेश अदानी आणि सीईओ विनय प्रकाश आहेत. कंपनी ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करते. अदानी एंटरप्रायझेस ही देशातील सर्वात मोठी बिझनेस इनक्यूबेटर आहे. ही कंपनी ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि लॉजिस्टिक, ग्राहकोपयोगी वस्तू आणि प्राथमिक उद्योग या क्षेत्रात काम करते. (Adani to Enter Petrochemicals)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.