कोरोना प्रतिबंधात्मक लस असलेल्या कोविशील्ड या लसीची किंमत सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी कमी केली. यापुढे राज्य सरकारांना ३०० रुपयांत ती लस मिळेल, अशी माहिती पूनावाला यांनी ट्विटद्वारे जाहीर केले.
१ मे पासून होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाआधी वाढवलेली किंमत!
यापूर्वी पूनावाला यांनी ट्विट करून कोविशील्डच्या लसीचे दर वाढवल्याची माहिती ट्विट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा १ मे पासून देशभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाचेही लसीकरण करण्यात येईल, असे जाहीर केले. नंतर पूनावाला यांनी लसीची किंमत वाढवली. याआधी ही लस २५० रुपयांना मिळत होती, मात्र सुधारित पत्रकात पूनावाला यांनी याची किंमत वाढवून ती राज्य सरकारांना ४००, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांत लस उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते.
(हेही वाचा : सिरमनंतर भारत बायोटेकने जाहीर केल्या लसीच्या नव्या किंमती! किती रुपयात मिळणार कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड? वाचा…)
केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद!
सीरमने लसीची किंमत वाढवल्याने राज्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अदर पूनावाला यांना लसीची किंमत कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अदर पूनावाला यांनी किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे राज्य सरकारांना सीरमची लस ४०० ऐवजी ३०० रुपयांना मिळेल मात्र खासगी रुग्णालयांना ही लस ६०० रुपयांनाच मिळेल, असे पूनावाला यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले अदर पूनावाला?
आपण सीरमच्या लसीची किंमत कमी करत असून राज्यांना ती ४०० ऐवजी ३०० रुपयांना मिळणार आहे. लसीची किंमत कमी केल्याने राज्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तसेच असंख्य जणांचे प्राण वाचणार आहेत, असे सीरमचे प्रमुख अदर पूनावाला म्हणाले आहेत.
As a philanthropic gesture on behalf of @SerumInstIndia, I hereby reduce the price to the states from Rs.400 to Rs.300 per dose, effective immediately; this will save thousands of crores of state funds going forward. This will enable more vaccinations and save countless lives.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 28, 2021