पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या (AC Local) फेऱ्या वाढवण्याचीा निर्णय घेतला असून येत्या २० जूनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या चार वातानुकूलित लोकल असून यांच्या दिवसातून ३२ फेऱ्या होतात. यात आता आणखी ८ फेऱ्यांची भर पडणार असून पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या दिवसातून ४० फेऱ्या सुरू होणार आहेत. मात्र शनिवार व रविवारी फक्त ३२ फेऱ्या होतील आणि अतिरिक्त ८ फेऱ्यांऐवजी सामान्य लोकल चालवल्या जातील असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : Google Map या अॅपमध्ये नवे फिचर! प्रवासादरम्यान पैसे वाचवण्याची संधी)
वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५ मे पासून ५० टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे AC लोकलला मिळणारा प्रतिसाद वाढू लागला. पूर्वी दिवसाला दीड ते तीन हजार तिकिटांची विक्री होत होती दरात कपात केल्यापासून आता ८ ते ९ हजार तिकिटांची विक्री होत आहे. वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलच्या १२ फेऱ्या १६ मे पासून वाढवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त आठ फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
जलद लोकल – चर्चगेटच्या दिशेने
- विरार ते दादर जलद – सकाळी ६.५७ वाजता
- विरार ते चर्चगेट जलद – सकाळी ९.३४ वाजता
- मालाड ते चर्चगेट – सायंकाळी ६.४४ वाजता
- वसई ते चर्चगेट – रात्री ८.४१ वाजता
जलद लोकल – विरारच्या दिशेने
- दादर ते विरार – सकाळी ८.१८ वाजता
- चर्चगेट ते मालाड – सकाळी ११.०३ वाजता
- चर्चगेट ते वसई रोड – सायंकाळी ७.०५ वाजता
- चर्चगेट ते विरार – रात्री ९.५७ वाजता