अतिरिक्त बूस्टर डोसची आवश्यकता आहे का? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

जगभरात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर झाल्यामुळे सर्व देशांमधील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. भारतात अजूनही कोरोनाची चौथी लाट आलेली नाही परंतु कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात भारतीय आरोग्य मंत्रालयाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताजवळील चीन, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड आणि जपान या ६ देशांमधून येणाऱ्या नागरिकांना RTPCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वेत नोकरीची संधी! परीक्षेविना होणार निवड, येथे करा अर्ज )

आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण 

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत सध्या अतिरिक्त कोरोना बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारला सर्वात आधी सध्या सुरू असलेला बूस्टर डोस ड्राईव्ह पूर्ण करायचा आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये देशात नव्या १३४ रुग्णांची नोंद करण्यात आली असून देशात सध्या कोरोनाचे २५८२ सक्रीय रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here