Konkan Railway : गणेशोत्सवासाठी कोकणातील गाड्यांना अतिरिक्त कोच

प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात कोच वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

239
Konkan Railway च्या 'या' गाड्या १ महिना एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावणार, कोकण रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
Konkan Railway च्या 'या' गाड्या १ महिना एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावणार, कोकण रेल्वे प्रशासनाने दिली माहिती

दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) सर्वच गाड्या हाऊसफुल्ल असतात. त्यातून गणेशोत्सव असल्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा यादीही मोठी असते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात कोच वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे याचा लाभ गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना होणार आहे.

हापा-मडगाव (२२९०८) एक्स्प्रेसमध्ये २३ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच वाढविला आहे. मडगाव-हापा (२२९०७) एक्स्प्रेसमध्ये २५ ऑगस्टला एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. पोरबंदर-कोचुवेली (२०९१०) आणि कोचुवेली ते पोरबंदर (२०९०९) या एक्स्प्रेसमध्ये अनुक्रमे २४ आणि २७ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच जोडला जाणार असल्याचे माहिती कोकण रेल्वेच्या माध्यमातून देण्यात आली

(हेही वाचा :Antilia explosives-Mansukh Hiren murder case : प्रदीप शर्मा यांना न्यायालयाकडून दिलासा)

आठवड्यातील सहा दिवस मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते सावंतवाडी ही विशेष गाडी क्रमांक ०९००९ धावणार आहे. १४ ते १८ सप्टेंबर आणि २० ते ३० सप्टेंबर पर्यंत रात्री १२.०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता सावंतवाडीला पोहोचेल.ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबणार आहे.धना ते मडगाव ही गाडी क्र. ०९०१८ उधना येथून दर शुक्रवारी १५, २२ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२५ वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०९०१७ मडगाव जंक्शन येथून शनिवारी १६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल. ही गाडी नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.