कोकणवासीयांना बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर २४ विशेष गाड्या

170

गणेशोत्सवात मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात आपापल्या गावी जातात. याच दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या जादा गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे…

मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) विशेष गाड्या

मुंबई सेंट्रल येथून मंगळवारी २३, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ठोकूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ठोकूरहून मुंबई सेंट्रलकरिता बुधवार, २४ आणि ३१ ऑगस्ट तसेच ७ सप्टेबर रोजी रात्री १०.४५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी ७ वाजता पोहोचेल.

मुंबई सेंट्रल – मडगाव जं. – मुंबई सेंट्रल (मंगळवारव्यतिरिक्त दररोज) विशेष गाड्या

मुंबई सेंट्रल येथून २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या काळात सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १२ वाजता ही गाडी सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत बुधवारव्यतिरिक्त दररोज सकाळी ९.१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटेपूर्वी १ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

वांद्रे – कुडाळ – वांद्रे साप्ताहिक विशेष गाडी

गुरुवारी, २५ ऑगस्ट आणि १ तसेच ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी शुक्रवारी, २६ ऑगस्ट, २ आणि ९ सप्टेंबरला सकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि रात्री साडेनऊ वाजता वांद्रे येथे पोहोचेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.