- विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महापालिकेतील (BMC) सहायक अभियंते हे पदोन्नतीसाठी पात्र असूनही कार्यकारी अभियंता या पदावर त्यांना बढती दिली जात असून तब्बल १०० सहायक अभियंता हे पदोन्नतीपासून वंचित आहे. मात्र ही बढती आणि भरती प्रक्रिया न करता एकप्रकारे अभियंत्यांवर अतिरिक्त कामांचा बोजा टाकला जात आहे. काही मर्जीतील अधिकाऱ्यांना जास्तीचा चार्ज आणि अतिरिक्त कार्यभार दिला जात असून हा कार्यभार का दिला जातो याची चौकशी करण्याची मागणी विधीमंडळात उबाठा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांनी केली.
(हेही वाचा – BMC अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची प्रतिनियुक्ती नोव्हेंबर २०२९ पर्यंत?)
मुंबई महापालिकेतील (BMC) १०० हून अधिक सहायक अभियंत हे कार्यकारी अभियंता पदाच्या प्रतीक्षेत असून पदोन्नतीसाठी पात्र असूनही या अभियंत्यांना बढती दिली जात नसल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने मागील आठवड्यात प्रसिध्द केली. या वृत्तानंतर याचे पडसाद विधीमंडळात उमटले. उबाठा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांनी विधीमंडळात नगरविकास खात्यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्दयावर बोलतांना, मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय १०० सहायक अभियंता हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. हे सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता या पदासाठी पात्र असूनही त्यांना पदोन्तीपासून वंचित ठेवले जात आहे. नगर अभियंता विभागामार्फत पदोन्नती व भरती प्रक्रिया राबवल्या जात नसून अभियंत्यांकडून अतिरिक्त कामे करून घेतली जातात. या अतिरिक्त कामांच्या ताणामुळे महापालिकेच्या विकास कामांची गुणवत्ता ढासळली असून अधिकाऱ्यांवर ताण येत असल्याने शारीरिक व मानसिक तणाव वाढत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. ही भरती न करण्यामागे नगर अभियंता विभागाचा काही हिडन अजेंडा आहे का असा सवाल करत काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना जास्तीचे चार्ज आणि अतिरिकत कार्यभार दिला जातो का याची चौकशी व्हावी अशी मागणी प्रभु यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community