- ऋजुता लुकतुके
आदील सुमारीवाला हे आंतरराष्ट्रीय कार्यकारिणीतील चार उपाध्यक्षांपैकी एक असणार आहेत. ॲथलेटिक्समध्ये एका भारतीयाने भूषवलेलं हे सर्वोच्च जागतिक पद आहे
भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदील सुमारीवाला यांची वर्णी थेट आंतरराष्ट्रीय फेडरेशनवर लागली आहे. आंतरराष्ट्रीय कार्यकारिणीतील चार उपाध्यक्षांपैकी सुमारीवाला एक असतील. एखाद्या भारतीयाने ॲथलेटिक्सच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत भूषवलेलं हे सर्वोच्च पद आहे.
( हेही वाचा – IND vs IRE T20I : कर्णधार जसप्रीत बुमरावर सगळ्यांचं लक्ष, टी-२० सामना कुठे, कधी बघायचा?)
६५ वर्षीय सुमारीवाला २०१२ पासून भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. दोन दिवसांत जागतिक ॲथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा होणार आहेत. त्यापूर्वी फेडरेशनच्या निवडणुकाही पार पडल्या. आणि यात सुमारीवाला यांना तिसऱ्या पसंतीची मतं मिळाली. एकूण चार जागा असल्यामुळे त्यांची निवड झाली. सुमारीवाला जागतिक ॲथलेटिक्सच्या उपाध्यक्षपदी चार वर्षं असतील.
Insert tweet – https://twitter.com/WorldAthletics/status/1692100767765708938?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1692100767765708938%7Ctwgr%5Ecf16630c3e965b1adf37f483870237589f95f015%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Ftimesofindia.indiatimes.com%2Fsports%2Fmore-sports%2Fathletics%2Fafi-chief-adille-sumariwalla-elected-to-world-athletics-executive-board%2Farticleshow%2F102808759.cms
जागतिक ॲॅथलेटिक्स फेडरेशनच्या या कार्यकारिणीत ४ उपाध्यक्षांच्या जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. जागतिक फेडरेशनमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी जागतिक ॲथलेटिक्स कार्यकारिणीकडे असते. या कार्यकारिणीत एक अध्यक्ष, चार उपाध्यक्ष, तीन पदनियुक्त सदस्य आणि एक मुख्य कार्यकारी अधिकारी असे नऊ लोक असतात.
सुमारीवाला २०१५ पासून जागतिक ॲथलेटिक्स फेडरेशनच्या परिषदेचा भाग आहेत. शंभर मीटर धावपटू आदील सुमारीवाला यांनी १०८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर १९७९च्या आशियाई खेळात त्यांनी याच प्रकारात भारतासाठी पदकही जिंकलं होतं. राष्ट्रीय स्तरावर सर्वात वेगवान धावपटू म्हणून त्यांनी केलेला राष्ट्रीय विक्रम 18 वर्षं अबाधित होता.
हेही पहा –