इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी मंत्री आदित्य ठाकरेंचा पुढाकार

126

राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार केल्यानंतर राज्यात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याअनुषंगाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देऊन वाहन निर्मितीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चिंचवड वसाहतीतील कायनेटीक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन लिमिटेड या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट देवून वाहनांची माहिती घेतली. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, कंपनीचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, कार्यकारी संचालक अजिंक्य फिरोदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुलेजा फिरोदिया आदी उपस्थित होते.

Aditya Thackeray 2

(हेही वाचा : पावसामुळे साईटी न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय)

कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची घोषणा

पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, उत्पादन कालावधी, चार्जिंग कालावधी आदी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असून भविष्यात इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते कंपनी आवरात वृक्षारोपण करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.