आदित्य ठाकरे भडकले : महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स तयार केल्या, सत्ता आल्यानंतर सर्व लुटारुंना आत टाकणारच

307
आदित्य ठाकरे भडकले : महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स तयार केल्या, सत्ता आल्यानंतर सर्व लुटारुंना आत टाकणारच
आदित्य ठाकरे भडकले : महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स तयार केल्या, सत्ता आल्यानंतर सर्व लुटारुंना आत टाकणारच

मुंबई महापालिकेत मागील वर्षभरापासून नगरसेवक नाही, समित्यांचे अध्यक्ष नाहीत. हे नसताना महापालिकेतील प्रशासकाच्या माध्यमातून सरकार जो काही मुंर्बकरांच्या पैशांवर डल्ला मारत आहे, भ्रष्टाचार करत आहे, तो आम्ही खपवून घेणार नाही. रस्ते कंत्राट, खडीचे कंत्राट, स्ट्रीट फर्निचर, सॅनिटरी वेंडींग मशिन्स आदीच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स मी पण तयार केल्या. आमचे सरकार आल्यानंतर पहिले काम जर कोणते असेल ते या लुटारुंना जेलमध्ये टाकण्याचे. जे कोणी महापालिकेचे अधिकारी असतील, घोटाळेबाज सरकारमधील पक्षांचे नेते असतील त्यांना आमचे सरकार आल्यानंतर आत टाकणार म्हणजे टाकणारच, असा धमकी वजा इशाराच शिवसेना उबाठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी महापालिकेवर काढलेल्या मोर्चादरम्यान दिला.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयात मोर्चा आयोजित केला होता. मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढल्यानंतर महापालिका मुख्यालयासमोर याचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या या गर्दीला भगवे वाद संबोधत समझने वालो को इशारा काफी असे निदर्शनास आणून दिले. आजवर २५ वर्षे जी कामे केली ती आम्ही करून दाखवली म्हणून जनतेसमोर आणली.

आज महापालिकेने नगरसेवक नाही, समित्यांचे अध्यक्ष नाही. सामान्य जनतेला महापालिकेत प्रवेश नाही, पण बिल्डर, कंत्राटदारांना थेट प्रवेश दिला जातो, असे सांगत भाजपने प्रत्युत्तरादाखल केलेल्या चोर मचाये शोरचा समाचार घेत निवडणूक घ्या मग चोर कोण तो दाखवतो. या चोरांना पळवून लावल्याशिवाय राहणार नाही,असे सांगितले. सध्या महापालिकेच्यावतीने कोविड काळात केलेल्या कामांची चौकशी होत असल्याने संतप्त झालेल्या ठाकरे यांनी मुंबईसह ठाणे,नाशिक, नागपूर आणि पुण्याच्या महापालिकेच्या कारभाराचीही चौकशी व्हावी असे आव्हान दिले.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : मग त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी‘ म्हणायचे का? – बावनकुळे)

यावेळी त्यांनी रस्ते सिमेंट काँक्रिट कंत्राटात मोठा घोटाळा झाला असून आपल्या पत्रानंतर १ हजार कोटी रुपये आपण महापालिकेचे वाचवले असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे या रस्त्याची फाईलही आपण तयार केली असून जिथे जिथे चोरी केली आहे, तिथे तिथे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आमचे सरकार आल्यावर पोलिसांच्या मदतीने त्यांना जागा दाखवू. यावेळी त्यांनी खडी घोटाळा कसा झाला तसेच स्ट्रीट फर्निचर कंत्राट प्रकरणी आपल्यासह भाजपचे मिहिर कोटेचा, सपाचे रईस शेख या आमदारांना उपायुक्तांनी कशाप्रकारे वेगवेगळी माहिती दिली हे सांगितले. तसेच सॅनिटरी वेंडींग मशिनच्या खरेदीतही कसा भ्रष्टाचार झाला हे सांगण्याचा प्रयत्न करत मी आज याविरोधात लढाई देत आहे. मी जिद्दीने उभा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी वांद्रे पूर्व येथील रिक्षा युनियनच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा चालवताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे बाळासाहेबांचे बॅनरवरील फोटो जिथे आहे त्याच्या उलट्याबाजुला हातोड्याचा प्रहार केला याची आठवण करून हे तो हातोडा फोटोवर चालवला,कुणाच्या सांगण्यावरून चालवला होता,असे सांगत प्रत्येक ठिकाणी या घटनेचे स्मरण करा असे असेही आवाहन शिवसैनिकांना केले.

शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राचेच नव्हेतर देशाचे नेतृत्व म्हणून केले. या मोर्चाला जनतेचा नाही तर ३३ कोटी देवतांचाही आशिर्वाद असल्याचे सांगितले. निवडणूक घ्या म्हणजे चोर कोण आहे शोर कुणाचा आहे हे दाखवून देवू सांगितले. तर माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू यांनी २५ वर्षांत महापालिकेत झालेल्या विकासाची जंत्री वाचून दाखवत आरोग्य, शिक्षण, पाणी यासाठी कोणते प्रयत्न केले हे सांगण्याचा प्रयत्न केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.