Adivasi Ashram Shala : २६ आमदार, ४ खासदार राहणार आदिवासी आश्रमशाळेत; काय आहे कारण?

37
Adivasi Ashram Shala : २६ आमदार, ४ खासदार राहणार आदिवासी आश्रमशाळेत; काय आहे कारण?
Adivasi Ashram Shala : २६ आमदार, ४ खासदार राहणार आदिवासी आश्रमशाळेत; काय आहे कारण?

राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांसाठी (adivasi ashram shala) “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आणि आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या, गरजा आणि सुधारणा याचा आढावा घेणार आहेत.

( हेही वाचा : पालिका Elections डोळ्यासमोर ठेऊन SEO या शोभेच्या पदाचे वाटप?

७ फेब्रुवारी रोजी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील बोटोनी (Botoni) येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) मुक्कामी राहणार आहेत. राज्यभरातील २६ आमदार आणि ४ खासदारही स्थानिक पातळीवर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. (Tribal Community)

या उपक्रमाद्वारे शिक्षणाच्या (Education) सुविधा, वसतिगृहांची स्थिती, अन्न व पोषण, आरोग्य व्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यावर त्वरित उपाययोजना केली जाणार आहे. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी हा उपक्रम पुढे नेण्याचा सरकारचा मानस आहे. “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा उपक्रम फक्त पाहणी करण्यापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रभावी निर्णयघेण्यात येतील. (Tribal Community)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.