राज्यात ४० हजार विद्यार्थ्यांचा आयटीआयला प्रवेश; नव्या प्रवेशांसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

124

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) पहिली प्रवेश फेरी जाहीर झाली असून, राज्यात ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट व मेकॅनिक डिझेल या ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळत आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी मिळून ९७५ आयटीआय आहेत. यामध्ये १ लाख ३५ हजार ७७३ जागा उपलब्ध आहेत.

( हेही वाचा : दिलासादायक! खाद्यतेलाच्या किंमती 15 रुपयांनी कमी होणार)

२७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

या जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावीनंतर झटपट रोजगाराचा मार्ग म्हणून आयटीआयला प्रवेश घेतात. राज्यात २ लाख ४८ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या फेरीत ९२ हजार १४० विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. नव्या प्रवेशांसाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना डीव्हीईटीच्या https://admission.dvet.gov.in/ वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.