व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 17 जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. यंदा शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून 1 लाख 49 हजार 238 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 900 जागा कमी झाल्या आहेत.
दहावीनंतर अकरावी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश न घेणारे विद्यार्थी आयटीआयच्या एक किंवा दोन वर्षे मुदतीच्या विविध अभ्यासक्रमांकडे वळतात. गेल्या काही काळात आयटीआयचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही रोजगार संधी उपलब्ध होत असल्याने, आयटीआय अभ्यासक्रमानांही मागणी निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी 1 लाख 50 हजार 204 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती, तर यंदा 1 लाख 49 हजार 268 जागांवर प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 900 जागा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
( हेही वाचा: मनसेचे नेते वंसत मोरे यांच्या मुलाला धमकीचे पत्र; फेसबुक पोस्टही चर्चेत )