विद्याविहार येथील K. J. Somaiya College चे अॅडमिशन रॅकेट उद्धवस्त

127
पूर्व उपनगरातील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात (K.J. Somaiya College) बोगस मार्कशीट आणि शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देणारे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. टिळक नगर पोलिसांनी या प्रकरणी महाविद्यालयातील दोन  क्लर्कसह तीन जणांना अटक केली असून या टोळीने अकरावी प्रवेशासाठी जवळपास ५० ते ५५ विद्यार्थांच्या पालकांकडून प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपये घेऊन महाविद्यालयात प्रवेश दिल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाच्या तपासात २४ विद्यार्थ्यांचे बोगस मार्कशीट बनवून त्यात मार्क वाढवल्याचे समोर आले आहे.
महेंद्र पाटील अर्जुन, राठोड आणि देवेंद्र सादे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून महेंद्र आणि अर्जुन राठोड हे दोघे सोमय्या महाविद्यालयाचे क्लर्क असून देवेंद्र सादे हा एजंट आहे. या टोळीने केजी सोमय्या महाविद्यालयात (K.J. Somaiya College) कमी टक्केवारीमुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गाठून त्यांच्या मुलांना सोमय्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दोन ते अडीच लाख रुपये घेऊन या टोळीने महाविद्यालयातील क्लर्क यांना हाताशी धरून सोमय्या महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करण्यात आले होते.महाराष्ट्र र्बोर्डा व्यतिरिक्त CBSC, IB, ICSE, IGCSE व इतर शैक्षणिक बोर्डाच्या चेअरमनची सही व लोगो असलेले खोटे मार्कशिट तयार केले व ते खरे म्हणून वापरून त्यांची फसवणूक केली.  विद्यार्थ्याच्या पालकांकडून बेकायदेशीररित्या दोन ते अडीच लाख रुपये स्विकारून बनावट व बोगस मार्कशिट व लिव्हींग सर्टिफिकेट बनवण्यात आले होते,  तसेच ऑनलाईन प्रवेशादरम्यान जनरेट होणारा लॉगीन आयडी व पासवर्ड स्वतः कडे घेवून सरकारी पोर्टलवर ऑनलाईनव्दारे अपलोड करून त्याआधारे महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून दिला होता.
हा प्रकार के.जी. सोमय्या महाविद्यालयाचे (K.J. Somaiya College) प्राचार्य यांच्या लक्षात आला असता त्यांनी चौकशीसाठी कॉलेजची एक कमिटी नेमली, या कमिटीच्या चौकशीत २४ विद्यार्थ्यांचे मार्कलिस्ट बोगस असल्याचे आढळून आले, महाविद्यालयातील क्लार्क महेंद्र पाटील आणि अर्जुन राठोड यांनी दलालांच्या मार्फत फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. टिळक नगर पोलिसांनी महाविद्यालयाच्या क्लार्कसह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री पोलिसांनी क्लार्क महेंद्र पाटील आणि अर्जुन राठोडसह एका दलालाला अटक केली असून मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.