नवी मुंबईच्या टीटीसी एमआयडीसी परिसरातून तब्बल २९ कोटींचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा, तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेंतर्गत उपरोक्त कारवाई केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.
अचानक भेट देऊन छापे घालण्यात आले
टीटीसी एमआयडीसी परिसरातील अन्न आस्थापना व कोल्ड स्टोरेज व गोदामांमध्ये अचानक भेट देऊन छापे घालण्यात आले. या दरम्यान २९ कोटी रुपयांचे आयात अन्न पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये मे. सावला फूड्स ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-३९, व सावला फूड्स अँड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-५१४ मधून अन्न पदार्थाचे एकूण ३५ नमुने विश्लेषणासाठी घेऊन त्यांचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला.
(हेही वाचा संघर्ष निरंतर जारी है अब पठाण कि बारी है! सोशल मीडियात ट्रेंड होतोय #BoycottPathan)
तपासणी अहवाल लवकरच
नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन संबंधित अन्न पदार्थांचा उर्वरित साठा जप्त करून परवानाधारकांच्या ताब्यात पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेले सर्व अन्न नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा, मुंबई येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले असून, विश्लेषण अहवाल प्रथम प्राधान्याने देण्याबाबत कळविण्यात आले आहे. तपासणी अहवालामध्ये आढळून आलेल्या गंभीर त्रुटींबाबत तपासणी अहवाल संबंधित सहायक आयुक्त (अन्न), ठाणे यांना पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community