-
प्रतिनिधी
“आपले सरकार इथल्या मातीला नमन करणारे आहे. मराठी नाटक, सिनेमा, कला, लोककला आणि लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. “अमृतातेही पैजा जिंके” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात करण्यात आले होते.
(हेही वाचा – Waqf विधेयकातील १४ बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता)
मराठी भाषेच्या सौंदर्याचा अनोखा आविष्कार
या विशेष कार्यक्रमात मराठी भाषेतील कविता, नाट्यगीतं, गाणी आणि विविध बोली भाषांमधील अभिव्यक्ती सादर करण्यात आली. मराठी रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, अभिनेत्री मधुरा वेलणकर, अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री, अभिनेते मंदार आपटे, गायिका माधुरी करमकर आणि निवेदक धनंजय म्हसकर यांनी आपली कला सादर केली. (Adv. Ashish Shelar)
(हेही वाचा – Property Tax : एका महिन्यात १९ टक्के मालमत्ता कर वसुलीचे महापालिकेपुढे लक्ष्य)
सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar), महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील मोने, सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासन नेहमीच कार्यरत राहील आणि भाषेचा अभिमान जपण्यासाठी अशा उपक्रमांना पुढे नेईल, असेही मंत्री आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community