Central Jail Of Maharashtra : ‘या’ चार कारागृहात मिळणार अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा

ही यंत्रे खरेदी करण्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे

118
Central Jail Of Maharashtra : 'या' चार कारागृहात मिळणार अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा
Central Jail Of Maharashtra : 'या' चार कारागृहात मिळणार अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा

कारागृहातून कैदी पळून जाणे अशा अनेक घटना घडतात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार मुंबई मध्यवर्ती कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह या चार कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. (Central Jail Of Maharashtra )

ही यंत्रे खरेदी करण्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत २०१७ मध्ये जनहित याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश राज्यशासनास दिले होते. त्यानुसार २०१७ पासून शासनाने राज्यातील कारागृहांची सुरक्षा व्यवस्था आधुनिक करण्यावर भर दिला आहे.

(हेही वाचा : Mumbai Airport : दिवाळीत विक्रमी उड्डाणे, दर दीड मिनिटाला उड्डाण किंवा लँडिंग सुरूच)

या चार मध्यवर्ती कारागृहांत बसवण्यात येणारी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्यास राज्याच्या तुरुंग उपविभागाच्या प्रकल्प अंमबजावणी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी १४ कोटी ४४ लाख ७१ हजार २७६ आणि बॉडी स्कॅनरसाठी ९ कोटी १२ लाख अशा एकूण २३ कोटी ५६ लाख ७१ हजार २७६ रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच खरेदीची प्रक्रिया सुरू होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.