Health Department : आरोग्य विभागातील 12 हजार जागांसाठी पुढील आठवड्यात निघणार जाहिरात

165

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १७ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची राज्य सरकारने आता गंभीरतेने दखल घेतली आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरातच आरोग्य विभागाकडून मोठी नोकरभरती होणार आहे. जवळपास 12 हजार जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात निघणार आहे. यात क आणि ड वर्गाच्या पदांसाठी जाहिरात असणार असल्याचे बोलले जात आहे.

अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती, आता ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे.

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील जागांसाठी भरती

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.

(हेही वाचा RBI च्या नव्या नियमामुळे गृह कर्जाचे EMI वाढणार!)

या पदांचा असेल समावेश

गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.

अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली

सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा सर्व अतिरिक्त भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.

18 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण

ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे केवळ 10 तासांत 18 जणांनी प्राण गमावले. या रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या प्रशासनाचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.