महापालिकेत कनिष्ठ लघुलेखकांच्या २२५ जागासांठी लवकरच जाहिरात; परिक्षा प्रक्रियेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड

195

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील तब्बल २२५ रिक्त लघु लेखकांच्या जागांसाठी तसेच महापालिकेतील लिपिक अर्थात कार्यकारी सहायक संवर्गातील रिक्त पदे ही चतुर्थ श्रेणीतील कामगारांमधून अंतर्गत भरती केली जाणार आहे. या दोन्हींची परिक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेच्यावतीने इन्स्टीट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस  या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी व मराठी) या संवर्गातील २२५ पदे रिक्त असून या पदांसाठी अर्ज मागवून परिक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी रिक्त पदासाठी इन्स्टीट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस  या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही परिक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी या संस्थेला ९ लाख २५ हजार ७१० रुपये दिले जाणार आहे.

(हेही वाचा राज्यसभेतून खासदार रजनी पाटील निलंबित; कारण…)

याशिवाय महापालिकेतील कार्यकारी सहायक अर्थात लिपिक या संवर्गातील पदेही रिक्त आहेत. ही पदे शिपाई तथा कामगार आदी तत्सम चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांमार्फत भरली जाणार आहे. या अंतर्गत भरती प्रक्रियेसाठीही आयबीपीएस या संस्थेची निवड महापालिकेने केली आहे. यासाठी या संस्थेला २७ लाख  ४७ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

मुंबईमध्ये सन २००४-०५मध्ये लिपिक वर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती, या भरती परिक्षेची जबाबदारी आयबीपीएसवर सोपवण्यात आली हेाती. त्यामुळे ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यामुळे आयबीपीएस या संस्थेची निवड केल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या संस्थेची निवड करण्यात आल्याने लवकरच याबाबतची जाहिरात प्रकाशित करून अर्ज मागवण्यात येत पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ही भरती प्रकिया राबवण्यात येत असल्याने महापालिकेतील ओळखीचे दाखले देत अनेक भामटे इच्छुक उमेदवारांना फसवण्यासाठी जाळे टाकण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे या परिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा पैसे घेऊन काम केले जात नाही, त्यामुळे  जर कुणीही व्यक्ती आपली महापालिकेत ओळख आहे आणि अमुक पैसे भरा म्हणून पैसे घेऊन कामाला लावण्याचा विश्वास देत असेल अशा भामट्यांपासून दूर रहावे. महापालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कुणीही अशा भामट्यांच्या जाळ्यात अडकून आपली फसवणूक करून घेऊन नये अशाप्रकारचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून वारंवार केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.