BMC Recruitment : महापालिकेतील ६६४ अभियंत्यांची पदे भरण्यासाठी लवकरच निघणार जाहिरात

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/वास्तूशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. याबाबतच्या भरतीला प्रशासकांची मान्यता मिळाल्याने ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस संस्थेची नेमणूक यापूर्वीच करण्यात आलेली आहे.

29724
Goregaon Film City Road : गोरेगावमधील फिल्मसिटी मार्गावर पुन्हा वाढले फेरीवाले, मे महिन्यात घडला होता तो प्रकार

मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरण्याचे सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झालेले असून लवकरच या अभियंता भरतीची जाहिरात प्रकाशित केली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेतील ६६४ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्याकरता आय. बी. पी. एस या संस्थेची नेमणूक यापूर्वीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून शासनाच्या मान्यतेनंतर आता लवकरच याची जाहिरात प्रकाशित केली जाईल आणि त्यातील अटी व शर्तीनुसार ऑनलाईन परीक्षा घेऊन अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. (BMC Recruitment)

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/वास्तूशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. याबाबतच्या भरतीला प्रशासकांची मान्यता मिळाल्याने ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस संस्थेची नेमणूक यापूर्वीच करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, सिव्हील-२३६ पदे, कनिष्ठ अभियंता, एम अँड ई-११६ पदे, दुय्यम अभियंता सिव्हील-२३३ पदे, दुय्यम अभियंता, एम अँड ई-७७ पदे व वास्तूविशारद ९ पदे अशाप्रकारे एकूण पदे भरली जाणार आहे. या भरतीसंदर्भात आरक्षण तसेच बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या पडताळची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही दिवसांमध्येही ही प्रक्रिया पूण झाल्यानंतर याची जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे. पुढील १५ ते २० दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रकाशित केली जाईल असा विश्वास नगर अभियंता विभागातील अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुमारे सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील,असा अंदाज आहे. या पदांसाठी अंदाजित १ लाख २५ हजार अर्ज प्राप्त होतील असे गृहीत धरून यासाठी १० कोटी ७५ लाख १२ हजार रुपयांचा सेवा शुल्क अंदाजित करण्यात आला. (BMC Recruitment)

(हेही वाचा – Farmer Protest : शेतकरी संघटनांमध्ये आंदोलनावरून मतभेद)

इतके रुपये परीक्षा शुल्क आकारणार 

ऑनलाईन परीक्षेसाठी प्रक्रिया तसेच त्याचा निकाल लावण्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च आहे, तर कनिष्ठ अभियंत्यांचे सेवा शुल्क म्हणून पाच लाख रुपये, फोटो तसेच बायोमेट्रीककरता ३१ लाख रुपये, नोंदणीकृत उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये, परीक्षा केंद्रात मोबाईल जॅमर बसवण्यासाठी ४५ लाख अशाप्रकारे एकूण पावणे अकरा लाख रुपयांचा खर्च आयबीपीएसने दर्शवला आहे. त्यानुसार महापालिकेने या ऑनलाईन परीक्षेसाठी १०.७५ कोटी रुपये खर्च मंजूर केला आहे. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये व मागासवर्ग उमेदवारांना परीक्षा शुल्कात १० टक्के सवलत देऊन ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांनी या पदासाठी अर्ज केल्यास त्यांनाही याप्रमाणेच शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे यासाठी होणाऱ्या खर्चाचा बोजा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे बोलले जात आहे. (BMC Recruitment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.