बांगलादेशात (Bangladesh) देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले धर्मगुरु चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) यांच्या खटल्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकीलावर हल्ला करण्यात आला आहे. कोलकाता येथील इस्कॉनचे (ISKCON) राधारमण दास (Radharaman Das) यांनी हा दावा केला आहे. दरम्यान दि. २६ नोव्हेंबर रोजी ढाका न्यायालयाने चिन्मय दास यांचा जामीन फेटाळला आहे. त्यांच्या जामिनीवर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
( हेही वाचा : Mushtaq Ali T20 : दुखापतीतून सावरलेले सूर्यकुमार यादव, शिवम दुबे मुंबईकडून खेळण्यासाठी सिद्ध)
राधारमण दास यांनी समाजमाध्यमांवर रमण रॉय यांच्या छायाचित्रासह एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, चिन्मय दास यांचे वकील रमन रॉय (Raman Roy) यांच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला आहे. ते आयसीयूमध्ये आयुष्याशी झुंज देत आहेत. त्यांची येवढीच चूक आहे की त्यांनी कोर्टात चिन्मय दास यांचा बचाव केला. कट्टरवाद्यांनी त्यांच्या घराची तोडफोड करून त्यांच्यावर अमानुष हल्ला केला आहे, असे राधारमण दास म्हणाले.
दरम्यान बांगलादेशात इस्कॉनशी (ISKCON) संबंधित लोकांना सरकारी यंत्रणेच्या दबावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अशातच भारतात येणाऱ्या इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेश (Bangladesh) प्रशासनाने रोखल्याची बातमी समोर आली आहे. सर्व वैध कागदपत्रे असूनही इस्कॉनच्या (ISKCON) सदस्यांना भारतात येण्यापासून रोखले आहे. इस्कॉनच्या सदस्यांना बांगलादेशी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेपाशी बेनापोल बंदरावर (Benapole port) संशयास्पद हालचालीमुळे रोखल्याचे वृत्त तिथल्या माध्यमांनी दिले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community