Affordable Homes : देशातील आठ शहरांमध्ये कसे आहेत घरांचे भाव? कुठे भाव वाढतायत, कुठे होतायत कमी?

Affordable Homes : प्रॉपर्टी टायगरने पहिल्या तिमाहीतील घर विक्रीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

103
Affordable Homes : देशातील आठ शहरांमध्ये कसे आहेत घरांचे भाव? कुठे भाव वाढतायत, कुठे होतायत कमी?
  • ऋजुता लुकतुके

देशभरात पहिल्या तिमाहीत अर्थात जानेवारी ते मार्च महिन्यात घरांची विक्री काहीशी मंदावल्याचं चित्र आहे. प्रॉपटायगर डॉटकॉमने याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. मालमत्तेच्या वाढत्या किंमतीमुळे नवीन लॉन्च प्रकल्पही रखडल्याचं प्रॉपटायगरने म्हटलं आहे. डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अलीकडच्या अहवालानुसार, देशभरातील आठ प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत १९%ने कमी झाली. त्याचे कारण आहे मालमत्तेच्या वाढत्या किंमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगून आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत घरांची विक्रीचा वेग खूपच कमी झाला आहे. या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठा देखील १०% कमी झाला आहे. विकासकांनी गेल्या काही वर्षांमधील किंमतीत झालेल्या वाढीनंतर स्वतःच्या अपेक्षाही वाढवल्या. ज्यामुळे जगातील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या आपल्या देशात मोठ्या भागाच्या खरेदीदारांसाठी घर खरेदी करणे परवडण्याजोगे राहिले नाही. (Affordable Homes)

(हेही वाचा – Abhishek Nayar : अभिषेक नायर पुन्हा कोलकाता नाईटरायडर्सकडे परतणार?)

हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. ध्रुव अग्रवाला म्हणाले, “वाढत्या महागाईचा विपरीत परिणाम विक्रीवर आधीच दिसू लागला आहे. त्यात जागतिक ट्रेड-वॉरमुळे नवीन अनिश्चितता आली आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की, खरेदीदार गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगत आहेत आणि विशेष करून रिअल इस्टेट सारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत ते अधिकच सावध झाले आहेत. जर भारतीय रिझर्व बँकेने फेब्रुवारीत २५ बेसिस पॉइंटने दर कमी केल्याचे जाहीर केले नसते, तर विक्रीतील ही घट अधिकच तीव्र झाली असती.” या अहवालानुसार, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तिमाहीत १ लाख पेक्षा कमी घरे विकली गेली. या विश्लेषणात समाविष्ट करण्यात आलेल्या बहुतांशी शहरांत ही संख्या घटल्याचे दिसते. बंगळूर आणि चेन्नईमध्ये हा ट्रेंड दिसला नाही, तर हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात ही विक्री तीव्रतेने कमी झालेली दिसली. (Affordable Homes)

(हेही वाचा – “मला भावाशी बोलायचे आहे” ; NIA समोर अतिरेकी Tahawwur Rana ची मागणी)

बंगळुरूमध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११,७३१ घरांच्या विक्रीसह १३%ची वाढ पहायला मिळाली. चेन्नईमध्ये ही ४,७७४ घरांच्या विक्रीसह ८% ची वाढ झाली. या तुलनेत इतर प्रमुख शहरांत घरांच्या विक्रीत घसरण झालेली पाहायाला मिळाली. यात अहमदाबाद १०,७३० (-१७%), दिल्ली एनसीआर ८,४७७ (-१६%), हैदराबाद १०,४६७ (-२६%), कोलकाता ३,८०३ (-१%), मुंबई ३०,७०५ (-२६%), आणि पुणे १७,२८८ (-२५) येथे घरांची विक्री मंदावलेली दिसली. मार्केट करेक्शनचे संकेत नवीन पुरवठ्यात जी घट आली आहे त्यातून देखील दिसत होते. आठ पैकी पाच शहरांतील नव्या घरांच्या लॉन्चच्या संख्येत वार्षिक घट दिसून आली. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादेत संख्येच्या दृष्टीने सर्वात तीव्र घसरण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये २०२४ च्या तुलनेत नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या संख्येत क्रमशः १५,५४३ (-३८%), १०,१५६ (-३३%), २,३८४ (-२३%) ची घट झाली आहे. इतर प्रमुख शहरे जसे की चेन्नई ४,०७० (-१४%), मुंबई ३१,३२२ (-१५%) येथे ही नवीन लॉन्च प्रकल्पात घट झाली असल्याचे पहायला मिळाले. याउलट बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि कोलकाता येथे मात्र नवीन लॉन्च प्रकल्पात वाढ झाली आहे. (Affordable Homes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.