शिववंदनेनंतर पोलिसांना जाग; Saras Baug मध्ये नमाजपठण करणाऱ्या धर्मांधांवर मोठी कारवाई

428
शिववंदनेनंतर पोलिसांना जाग; Saras Baug मध्ये नमाजपठण करणाऱ्या धर्मांधांवर मोठी कारवाई
शिववंदनेनंतर पोलिसांना जाग; Saras Baug मध्ये नमाजपठण करणाऱ्या धर्मांधांवर मोठी कारवाई

पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेत नमाजपठण केल्याच्या प्रकरणी पाच ते सहा मुसलमानांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारसबाग उद्यानातील गणपती मंदिराच्या (Sarasbaug Ganpati) पाठीमागील बाजूस घडला आहे. या धार्मिक अतिक्रमणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी मागील शुक्रवारी, ५ जुलै रोजी बागेतीलच श्री गणेश मंदिरात शिववंदना सामूहिकपणे म्हटली. त्यानंतर आता अज्ञात मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – जातीपातीच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्री Nitin Gadkari संतप्त; म्हणाले…)

भादवी 295(अ), 188, 143 , महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) (ई) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर समाजाच्या भावना दुखून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नमाजपठण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यातील (Swargate Police Station) पोलीस हवालदार संदीप भास्कर गोडसे यांनी तक्रार दाखल करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदे पुढील तपास करीत आहेत.

आरतीचा दणदणाट कामाला आला – हिंदू महासभा

या प्रकरणी आरतीचा दणदणाट कामाला आला आणि अखेर गुन्हा दाखल झाला. अगदी शेजारी हाकेच्या अंतरावर आदमबाग मशीद असून सुद्धा केवळ हिंदूंना डिवचण्यासाठी सारसबागेत नमाजपठण केले गेले. आपल्या आरतीच्या आणि शिववंदनाच्या दणक्याने आज 2 वर्षांनी का असेना गुन्हा तर दाखल झालाच; पण भविष्यात असे काही घडणार नाही, या कडेही लक्ष देण्याचे आश्वासन आज स्वारगेट पोलिसांनी आम्हाला दिले आहे, अशी प्रतिक्रिया हिंदू महासंघच्या (Hindu Mahasabha) वतीने देण्यात आली आह.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसबाग हे पुण्यातील प्रसिद्ध उद्यान आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) ताब्यात असणाऱ्या या उद्यानात उघडपणे नमाजपठण करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. 5 मे 2022 रोजी सायंकाळी साडे सहा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान 5 मे रोजी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींनी प्रवेश केला. त्यानंतर सारस बागेतील गणपती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेड जवळील लॉन्सवर एकत्र येऊन नमाज पठण केले. त्यामुळे पालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करुन गैर कायदेशीर मंडळी जमवून गैर कृत्य केले.

काय आहे स्थानिक हिंदूंत्वनिष्ठांचा आक्षेप? 

पुण्यातील सारसबाग (Saras Baug) ही सर्वात जुनी बाग असून ती पुणे महापालिकेच्या मालकीची आहे. ही बाग पुण्यातील पर्यटनस्थळांपैकी एक असल्याने इथे पर्यटकांची जशी गर्दी असते, तशीच स्थानिक पुणेकरही दररोज या बागेत गर्दी करत असतात. पण मागील ३-४ वर्षांपासून या बागेत मुसलमान नमाजपठाणासाठी येऊ लागले आहेत. आता तर या बागेत (Saras Baug) नमाज पठणासाठी येणाऱ्या मुसलमानांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आता या बागेत येणाऱ्यांची विशेषतः हिंदूंची संख्या कमी होऊ लागली आहे. या बागेत हिंदू मुली आणि तरुणींना असुरक्षित वाटू लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी मुसलमान नमाज पठणासाठी का येत आहेत? महापालिका आणि पोलीस प्रसाशन कारवाई का करत नाही? असे हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे आहे. यासाठी येथे शिववंदनाही आयोजित करण्यात आली होती.

पोलिसांकडून हिंदूंवरच कारवाई

पोलिसांनी या प्रकारानंतर मुसलमानांना तर रोखले नाहीच; मात्र शिववंदनेचे आयोजन करणारे संग्राम (अक्षय) ढोले पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर ढोले-पाटील यांनी ११ जुलै रोजी शुक्रवारी पुन्हा शिववंदनेचे आयोजन केले. हे समजताच पोलिसांनी ढोले-पाटील यांना ९ जुलै रोजी नोटीस पाठवून त्यांना शुक्रवार, ११ जुलै रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले, तसेच पुन्हा शिववंदनासारखा कार्यक्रम आयोजित करणार नाही अशा स्वरूपाच्या अटीशर्थी टाकल्या. आता हिंदूंचा दबाव वाढल्यानंतर पोलिसांना मुसलमानांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.