ऐन सणासुदीला दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अमूलनंतर आता मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा दुधाच्या दरात तीन पट वाढ झाली आहे. मार्चनंतर मदर डेअरीने ऑगस्ट आणि आता ऑक्टोबरमध्ये दुधाचे दर वाढवले आहेत.
( हेही वाचा : Target Killing : काश्मिरमध्ये टार्गेट किलिंग; जम्मूतील शोपियानमध्ये काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या, परिसरात असंतोष)
दुधाच्या दरात वाढ
मदर डेअरीने दिल्ली – एनसीआरमध्ये फुल क्रीम दूध आणि गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. आम्ही फक्त फुल क्रीम आणि गायीच्या दुधाच्या दरात २ रुपये प्रति लिटरने वाढ करत आहोत नवीन किमती १६ ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याते मदर डेअरीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
१६ ऑक्टोबरपासून नवे दर लागू
गुजरात वगळता देशातील सर्व बाजारपेठांमध्ये ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दिल्ली -एनसीआर भागात रविवार १६ ऑक्टोबरपासून नवे दर लागू होणार आहेत. ग्राहकांना फुल क्रिम दुधासाठी ६१ रुपये प्रतिलिटरवरून आता ६३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर मदर डेअरी गायीचे दूध ५३ रुपयांवरून ५५ रुपये प्रतिलिटर झाले आहे. कच्च्या दुधाच्या किमती सतत वाढत आहेत यामुळे ही दरवाढ करण्यात येत असल्याचे मदर डेअरीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. उत्तर भारतातली काही भागात कमी पाऊस आणि चाऱ्याच्या किमतीत वाढ झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मदर डेअरीने यंदा तिसऱ्यांदा दुधाच्या दरांमध्ये वाढ केली आहे.
Join Our WhatsApp Community