अंधेरी पाठोपाठ जोगेश्वरीतही भाजप नगरसेवकाच्या पुढाकाराने कोविड सेंटर!

जोगेश्वरी पूर्व येथील नटवरनगर महापालिका शाळेत कोविड केअर आयसोलेश सेंटर हे मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने व केशवसृष्टी, जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि भाजपचे प्रभाग क्रमांक ७२चे नगरसेवक पंकज यादव यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे.

177

अंधेरी पूर्व येथील नित्यानंद महापालिका शाळेमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरनंतर आता जोगेश्वरी येथील पूर्व येथील नटवर नगर महापालिका शाळेत भाजपच्या आणखी एका नगरसेवकाने केशवसृष्टीच्या मदतीने कोविड सेंटर उभारले आहे. २५ खाटांचे हे कोविड सेंटर असून महापालिकेच्या वॉररुममधून रुग्णांना याठिकाणी दाखल केले जाणार आहे. परंतु येथील सर्व सुविधा या मोफत असणार आहे.

सेंटरची क्षमता २५ खाटांची!

जोगेश्वरी पूर्व येथील नटवरनगर महापालिका शाळेत कोविड केअर आयसोलेश सेंटर हे मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने व केशवसृष्टी, जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि भाजपचे प्रभाग क्रमांक ७२चे नगरसेवक पंकज यादव यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. या सेंटरची क्षमता २५ खाटांची असून या सेंटरचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रविवारी पार पडले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विमल केडीया, आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग अळवणी आणि जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आदी उपस्थित होते.

(हेही वाचा : पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे भाजपला ‘संजीवनी’, फडणवीस ‘ते’ वाक्य खरे करणार का?)

२४ तास डॉक्टरांची टिम तैनात असेल!

या सेंटरमध्ये २४ तास डॉक्टरांची टिम तैनात असेल तर तसेच अतिआवश्यक रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा, संपूर्ण दिवसाची भोजन, नाश्ताची सुविधा, औषधे, इसीजी व ब्लड मशीनची सुविधा आहे. हे सेंटर पूर्णपणे वातानुकूलित असेल. काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व कोलडोंगरी येथील नित्यानंद महापालिका शाळेत महापालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाच्या सहभागाने रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशनेच्या संयुक्त विद्यमाने व केशव सृष्टीच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर खुले झाले आहे. स्थानिक भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांच्या प्रयत्नाने ३० रुग्ण खाटांचे हे सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी समानच सुविधा आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या सेंटरमध्ये दाखल केले जावू शकते.

कांदिवलीत आरोग्य भवनमध्येही १३० खाटांचे कोविड सेंटर!

भाजपचे चारकोपचे आमदार योगेश सागर यांच्या प्रयत्नाने कांदिवली पश्चिम येथे भुराबाई आरोग्य भुवन हॉलमध्ये १३० खाटांचे कोविड केअर सेंटर भाजपच्यावतीने उभारण्यात आले आहे. याचे लोकार्पण मागील २६ एप्रिल रोजी पार पडले. यामध्ये २४ तास डॉक्टरांची टिम तैनात असणार आहे. शिवाय सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधाही मोफत पुरवल्या जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले होते.

New Project 4 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.